एक्स्प्लोर

मायलेकी एकाचवेळी 10 वी पास; मुलीसोबत आईचंही होतंय कौतुक; परीक्षेत दोघीही उत्तीर्ण, कुणाला किती गुण?

अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी कु.लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर हिने 500 पैकी 411 गुण म्हणजेच 82.20 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे

सोलापूर : राज्यातील 10 वीच्या परीक्षेचा (SSC results) निकाल नुकतेच जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवत कौतुकाची थाप मिळवलीय. तर, कुठे एखाद पठ्ठ्याने सर्वच विषयात 35 टक्के गुण मिळवत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पंढरपूर तालुक्यातील (Solapur) सूरज मलपेने 10 वी परीक्षेत सर्वच विषयात 35 टक्के गुण मिळवल्याने ग्रामस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला. तर, पंढरपूरच्या शेजारीच असलेल्या अकलूज येथे मायलेकीने एकाचवेळी 10 वीची परीक्षा पास केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकलूज येथील मायलेकीने एकाच वेळेस दहावीची परीक्षा देवून पास झाल्या आहे. मायलेकीने दोघींनी हे यश एकाचवेळी संपादन केल्यामुळे आई व मुलीवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षांव होत आहे.

अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी कु.लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर हिने 500 पैकी 411 गुण म्हणजेच 82.20 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तर तिची आई सौ. पुजा नागनाथ क्षीरसागर यांनी वयाच्या 37 व्या वर्षी दहावीची परीक्षा देवून 500 पैकी 218 गुण म्हणजेच 43.60 टक्के मार्क्स घेऊन पास झाली आहे. आई व मुलीने एकाचवेळी दहावीची परीक्षा पास झाल्यामुळे मायलेकीचे अकलूज परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पुजा नागनाथ क्षीरसागर या सध्या यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या 21 चारी जयसिंहनगर येथे सीआरपी पदावर कार्यरत आहेत. जीवनाच्या प्रवासात त्यांना अपुऱ्या शिक्षणामुळे अडचणी येऊ लागल्याचे लक्षात येताच वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी बाहेरुन 10 वी बोर्डाची परीक्षा देऊन हे यश संपादन केले आहे. घरकाम आणि नोकरी करीत वेळ मिळेल तसा आपल्या मुलीसोबत त्यांनी अभ्यास केला होता. दरम्यान, मुलीनेही आईला अभ्यासात खूप मदत केली, आता आपल्या मुलीला इंजिनिअर करण्याचे आईचे स्वप्नं आहे, त्याष्टीने मुलीचा पुढील शैक्षणिक प्रवास सुरु होणार आहे. 

SSC Exam Results : जुळ्या भाऊ-बहिणींना दहावीच्या परीक्षेत 97.8% असे सारखेच गुण

बहिणीने भावाला सोशल स्टडीजमध्ये मागे टाकले, तर भावाने सुद्धा गणितात बहिणीपेक्षा जास्त गुण घेतले. मात्र दोघांचे एकूण गुण सारखेच राहिले. कधी भांडण, कधी सहकार्य असा शैक्षणिक प्रवास करत दोघांनी एकमेकांचे नोट्स वापरले. एकमेकांची मदत घेतली आणि दहावीत सारखे गुण मिळवत वेगळाच योगायोग साधला आहे.

SSC Exam Result 2026:  दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के

मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के

मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी

हेही वाचा

सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget