सोलापूर पाणीप्रश्न! एबीपी माझाच्या ‘पाणीबाणी'नंतर मनपा आयुक्त अॅक्शन मोडवर, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
Solapur Water issue : सोलापुरातील पाण्याच्या प्रश्न एबीपी माझाने ‘पाणीबाणी’तून मांडल्यानंतर मनपा आयुक्त अॅक्शन मोडवर आले आहेत.
Solapur Water issue : सोलापुरातील पाण्याच्या प्रश्न (Solapur Water issue) एबीपी माझाने ‘पाणीबाणी’तून मांडल्यानंतर मनपा आयुक्त अॅक्शन मोडवर आले आहेत. मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्वतः फिल्डवर जात पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी केली. ओम्बासे यां शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी टाकीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेचं शहरात प्रत्यक्ष पाणी सोडणारे चावीवाले आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना
यावेळी मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. सोलापुरात दूषित, अवेळी आणि कमी दाबाने होणाऱ्या पाण्याचा प्रश्न आजच एबीपी माझाने पाणीबाणी या विशेष कार्यक्रमातून मांडला होता. त्यानंतर मनपा आयुक्त सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.
दूषित पाण्यामुळं दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता
सोलापुरात मोदीखान्याजवळील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळं दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला तर अन्य एक मुलगी गंभीर अत्यवस्थ असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या घटनेमुळं परिसरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन्ही मृत मुलींपैकी एका मुलीच्या न्यायवैद्यक तपासणीच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार तिचा मृत्यू मेंदुज्वरामुळं झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे व भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. तसेच महापालिकेचे प्रशासनही धावून आले. यावेळी स्थानिक झोपडपट्टीवासीयांच्या तीव्र संतापाला लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला सामोरे जावे लागले. उन्हाळ्याची तीव्रता वाढलेल्या सोलापुरात एकीकडे पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे त्यातसुद्धा दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.
अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप
मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे .भाजप आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे .दूषित पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना घडल्याने सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . (Solapur Water Death)
महत्वाच्या बातम्या:
























