एक्स्प्लोर

Solapur Fire : जीव वाचवण्यासाठी बेडरुममध्ये लपले,पण..; 13 तासानंतर 5 मृतदेह बाहेर, सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर

Solapur Fire News : 13 तासाहून अधिक वेळ आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्धवस्तेत अग्निशमाक दलाच्या जवानांनी बाहेर काढलं आहे. या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

Solapur Fire News :  सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आणखी चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, मागील 13 तासाहून अधिक वेळ आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्धवस्तेत अग्निशमाक दलाच्या जवानांनी बाहेर काढलं आहे. या पाचही जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे तातडीने रवाना करण्यात आलं होतं. मात्र, या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या आगीत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापुरातील या आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्धवस्तेत अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं आहे. या पाचही जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे तातडीने रवाना करण्यात आलं होतं. मात्र, या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. मागील जवळपास 13 तासाहून अधिक वेळ सोलापुरातला सेंट्रल इंडस्ट्री हा कारखाना आगीने धूमसत आहे.  आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात असून आधी आगीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात आलं होतं. यामध्ये तिघांचा आधीच मृत्यू झाला आहे. तर आता पाच जणांना बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आलं आहे. 

जीव वाचवण्यासाठी मास्टर बेडरुममध्ये लपून बसले 

रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना बाहेर काढलेलं आहे ते देखील मृत अवस्थेत आहेत. सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्याला लागलेल्या आगीत एकूण 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाच वाजता तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. सेंटर इंडस्ट्रीजचे मालक ही आतमध्ये अडकल्याची माहिती होती. त्यानुसार शोधकार्य पहाटेपासून सुरू होतं. हे सर्व पाच जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडता आला नाही. त्यामुळं श्वास गुदमरून आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व आठही मृतदेह हे सर्व शविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत. 

मृतांची नावे

1) सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मनसुरी (वय 87)

2) अनस मनसुरी (वय 24)

3) शीफा मनसुरी (वय24)

4) युसूफ मनसुरी (वय 1.6)

5) आयेशा बागबान (वय 38)

6) मेहताब बागवान (वय 51)

7) हिना बागवान (वय 35)

8) सलमान बागवान (वय 38)

उपविभागीय अधिकारी सदाशिव  पडदूने यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे. 

या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी

सरकारला विनंती आहे की या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी. महापालिकेची यंत्रणा काही प्रमाणात कमी पडल्याचे बाबा मिस्त्री म्हणाले. वेळोवेळी पाणी कमी पडत होते आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन खासगी टँकरद्वारे पाणी मागून घेतले आहे. अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले जरी असले तरी आग अद्यापही विझलेली नाही, आग विझवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरूच आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Ajmer Hotel Fire : हॉटेलच्या आगीत एका मुलासह चार जण जिवंत जळाले, आईनं चिमुरड्या मुलाला खिडकीतून फेकलं; पाचव्या मजल्यापर्यंत आगीचा लोट

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Embed widget