एक्स्प्लोर

पंढरपुरात पदाचा गैरवापर, अधिकाऱ्याच्या मुलाकडून विठ्ठलाला दुग्धाभिषेक, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्यक्त केली दिलगिरी

Pandharpur : अधिकाऱ्याच्या लहान मुलाने विठ्ठलाचा अभिषेक केल्याचा  व्हिडीओ व्हायरल झाला. टीका होऊ लागल्यावर दिलगिरी व्यक्त केली. 

Pandharpur : दररोज  विठ्ठल मंदिरातील नवनवीन वाद समोर येत आहेत. आता मंदिराचे नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मुलाचा देवाला दुधाने अभिषेक करत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. याबाबतच्या बातम्या आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यावर कार्यकारी अधिकारी शेळके यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त केली आहे. 

विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेच्यावेळी कार्यकारी अधिकारी शेळके यांच्याकडून रुक्मिणीची पूजा तर मंदिर सदस्य संभाजी शिंदे यांच्याकडून विठ्ठलाची पूजा झाली होती. यावेळी शेळके यांच्या मुलाकडून विठ्ठलाला शंखातून अभिषेक घालण्यात आला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वारकरी संप्रदायातून याला आक्षेप घेण्यास सुरुवात झाली होती. आम्ही 25 हजारांची पूजा करूनही आम्हाला असा अभिषेक करता येत नसताना अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून त्याला हा अधिकार मिळाला का? असा आक्षेप घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तातडीने मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
 
देवाच्या पूजेचा अधिकार कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला होता, मग मुलाला असा अभिषेक कसा करता आला? असा मुद्दा घेऊन वारकरी संप्रदायातील मंडळी आक्षेप घेऊ लागली होती. विठ्ठल भक्तांकडून अभिषेक किंवा पूजा असताना कोणत्याही भाविकाला देवाला हात लावू दिला जात नाही. असा अभिषेक देखील करता येत नाही. त्यामुळेच वारकरी संप्रदायाकडून या तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. 

यापूर्वी विठ्ठल जोशी यांनी प्रक्षाळ पूजेच्यावेळी विठ्ठलासमोर स्नान केले म्हणून त्यांचेवर देखील खूप टीका झाली होती. आता या नवीन कार्यकारी अधिकारी यांच्या लहान मुलाने केलेला अभिषेक चर्चेत आला आहे. वास्तविक राजेंद्र शेळके हे महिन्यापूर्वीच मंदिरात रुजू झाले आहेत. त्यांना अजून मंदिराचे नियम , प्रथा परंपरा याबाबत माहिती नसली तरी मंदिराच्या इतर प्रशासकीय अधिकारी वर्गाने याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे होते. त्यातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कार्यकारी अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. प्रक्षाळ पूजेच्यावेळी शेळके यांचा दहा वर्षाचा मुलगा सोवळे नेसून आई बाबांच्यासोबत पूजेच्या ठिकाणी उपस्थित होता. यासर्व प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करताना शेळके यांनी या सर्व प्रकारची चौकशी करण्यात येईल असे सांगितले आहे . 

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget