सायलेंट व्होटर मोदींच्या मागे, राज्यात 45 जागा नक्की जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा दावा
पंढरपूर : राजकारणात नेहमी अनेक गोष्टी वन फाईन मॉर्निंग घडतात , अजितदादांच्या शपथविधी माहित होता का कोणाला ? अजून राजकारण तापायाचे आहे, पण आजच सांगतो राज्यात 45 जागा येतील आणि विरोधकांना 3 जागा मिळतील, असा दावा राज्याचे उच्य तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पंढरपूर : राजकारणात नेहमी अनेक गोष्टी वन फाईन मॉर्निंग घडतात , अजितदादांच्या शपथविधी माहित होता का कोणाला ? अजून राजकारण तापायाचे आहे, पण आजच सांगतो राज्यात 45 जागा येतील आणि विरोधकांना 3 जागा मिळतील, असा दावा राज्याचे उच्य तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या अनेक योजनांचा लाभ घेणारा सायलेंट व्होटर नावाचा मोठा वर्ग असून तो जातपात, धर्म यांच्यावर आहे. तुम्ही काहीही भाषणे करा तो व्होटर म्हणजे मोदी भक्त असून हा सर्व लाभार्थी कायम मोदींच्या मागे राहतो. हे 2019 ला दिसून आले आणि अगदी आत्ताच्या तीन राज्याच्या विजयानेही दाखवून दिले, असे सायलेंट व्होटर कोणत्याही सर्व्हेत दिसत नाही आणि त्यामुळे सी व्होटर सर्व्हेचे अंदाज कधीच बरोबर येणार नाहीत, असा टोला लगावला. याच सी व्होटरने 2019 ला भाजप युतीला 16 जागा दाखवल्या होत्या आणि 41 मिळाल्या असे सांगत 2024 च्या लोकसभेला 45 जागा मिळणार असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला.
मनोज जरांगे यांच्या 20 जानेवारीच्या आंदोलनावर बोलताना प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र सरकार या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. एवढ्या मोठ्या समाजाचा अभ्यास करायला मागास आयोगाला किमान एक वर्षाचा वेळ लागेल. मात्र पूर्वीचा अभ्यास असल्याने आणि नवीन समिती वेगाने काम करीत असल्याने लवकरच अहवाल येईल, असे त्यांनी सांगितले. हा अहवाल आल्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलावणार असून अशी एखादी तारीख पकडून होणार नाही. गडबड केल्यास ते दिलेले आरक्षण टिकणार नाही, असा सल्ला जरांगे याना दिला. जरांगे यांच्याशी चार्चा करण्यासाठी गिरीश महाजन , संदीपान भुमरे , अर्जुन खोतकर अशी सरकार मधील मंडळी असून ते चर्चा करीत असल्याचे चंद्रकांत दादा यांनी सांगितले .
मोहिते आणि रणजित निंबाळकर यांच्या वादाकडे लक्ष वेधले असता आमच्याकडे देवेंद्र फडणवीस हे खूप मोठे उत्तर असून कोणताही प्रश्न असला की त्यांनी त्यात लक्ष घातले की प्रश्नच राहत नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व 48 जागांचा सर्व्हे पूर्ण झाला असून कोणत्या जागा कोणी लढवायच्या यासाठी आता फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्रित बसतील आणि याचा निर्णय होऊन जाईल. जिथे जो उमेदवार विजयी होईल त्या ठिकाणी भाजप मित्र पक्षांसह त्यांच्या पाठीशी राहील असे सांगितले.