(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आरक्षणाला विरोध केल्याने तरूणाच्या अंगावर ओतलं ऑईल,, सोलापुरातील मराठा कार्यकर्त्यांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाला मराठा कार्यकर्त्यांनी अंगावर ऑईल टाकून चोप दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर: राज्यातील मराठा समजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी दाखले (Kunbi Certificate) मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार देखील मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, हे आरक्षण ओबीसीमधून दिले जाणार असल्याने आता ओबीसी संघटना (OBC) आक्रमक झाल्या आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध दर्शवला असून ओबीसी समन्वय समितीने या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाला मराठा कार्यकर्त्यांनी अंगावर ऑईल टाकून चोप दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचा आरोप करत सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाला मराठा कार्यकर्त्यांनी अंगावर ऑईल टाकून चोप दिला. या प्रकरणात मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वतः प्रताप कांचन याने मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधत या प्रकरणी फिर्याद दिलीय. तर राम जाधव, योगेश पवार, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
सोलापुरात पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल
30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सोलापुरात मराठा आंदोलकानी प्रताप कांचन या तरुणास ओबीसी मधून आरक्षण देण्यास तुझा विरोध का? अशा पद्धतीने जाब विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रताप कांचनच्या डोक्यावरून ऑइल ओतले. तसेच त्याला चोप ही देण्यात आला. आंदोलक तरुणांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले. तसेच खिशातून पैसे काढून घेतले, बदनामी केली अशा आशयाची फिर्याद मराठा कार्यकर्त्यांविरोधात दिली. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 5 आरोपी विरोधात भादवि कलम 307, 143, 147, 149, 327, 427, 500, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगेचे आवाहन
मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना आवाहन केले आहे. मराठा समाजातील मुलांच्या विरोधात सुरु असलेलं षडयंत्र हाणुन पाडण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मी आज सांगत आहे, समाजाने उद्या सांगायला नको अगोदर आम्हाला का सांगितले नाही. तर, जात संपवू देऊ नका मराठ्याच्या मुलासोबत उभे रहा, हीच योग्य वेळ असून, एकत्र आला नाही तर मराठा समाज कधीच माफ करणार नाही असे आवाहन जरांगे यांनी मराठा नेत्यांना केले आहे.
हे ही वाचा :