Solapur News: सोलापुरात प्रसिद्धीसाठी काय पण, आता टेंभुर्णीत आली गौतमी पाटील थाळी
Solapur News: प्रसिद्धी मिळविण्यासाठी सध्या काहीपण केले जाते आणि याचेच उदाहरण टेंभुर्णी येथे दिसून आले आहे.
सोलापूर: गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात आहे. तिच्या नृत्यात अश्लीलता असल्याची टीका करत तिने डान्स करणं बंद करावं अशी मागणी काही मंडळींनी केली आहे. त्यामुळे सध्या गौतमी चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता याच प्रसिद्धीचा फायदा घेत हॉटेल मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटील यांच्या हस्ते हॉटेल सुमानाचे उद्घाटन करत गौतमीच्या नावाने थाळी सुरु केली आहे.
प्रसिद्धी मिळविण्यासाठी सध्या काहीपण केले जाते आणि याचेच उदाहरण टेंभुर्णी येथे दिसून आले आहे. टेंभुर्णी येथे नुकतेच हॉटेल सुमन या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उद्घाटन झाले. यामध्ये विशेष काय असे तुम्हाला वाटेल पण या हॉटेलचे उद्घाटन नृत्यांगना गौतमी पाटीलचा फॅन असलेले मालक महेश गोरे यांनी थेट गौतमी पाटील यांच्याच हस्ते ठेवले. एवढ्यावर गौतमी प्रेम न थांबता गोरे यांनी गौतमी पाटील यांच्या नावाने शुद्ध शाकाहारी थाळी सुरु करत मार्केटिंगचा नवीन फंडा शोधून काढला.
सध्या अनेक वादात अडकूनही नृत्यांगना गौतमी पाटील यांची क्रेझ तरुणाईत दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. गावोगावी होत असणाऱ्या गौतमी यांच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने तरुणाई आनंद घेताना दिसत आहे. याच प्रसिद्धीचा फायदा घेत हॉटेल मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटील यांच्या हस्ते हॉटेल सुमानाचे उद्घाटन करत गोतमीच्या नावाने ही थाळी सुरु केली आहे.
नृत्यांगणा गौतमी पाटील यांचे राज्यभरात लाखो चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना अलोट गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. माढा तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी शहरातील गौतमी पाटीलच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन करुन तिच्या नावाने हॉटेल मालकाने गौतमी स्पेशल थाळी सुरु केली आहे. या स्पेशल थाळीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाबजाम असे पदार्थ देऊन ही थाळी सजविण्यात आली आहे. या स्पेशल गौतमी पाटील व्हेज थाळीची किंमत 240 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणतात ना प्रसिद्धीसाठी काय पण, मग आता तुम्ही कधी टेंभुर्णीकडे जात असाल आणि तुम्हीही गौतमी पाटील यांचे फॅन असाल तर हॉटेल सुमनमध्ये जाऊन तिच्या नावाची थाळी एकदा खाऊन बघाच...
संबंधित बातम्या :
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर कायमस्वरुपी बंदी घाला, महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेची मागणी