गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर कायमस्वरुपी बंदी घाला, महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेची मागणी
Gautami Patil: लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या अश्लिल कार्यक्रमावर महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेने केलीय.
Gautami Patil: लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या अश्लिल कार्यक्रमावर महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेने केलीय. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी याबाबतचे निवेदन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच मिरज तालुक्यातील बेडग येथे मागील महिन्यात गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाच्या ठिकाणपासून काही अंतरावर दत्तात्रय ओमासे या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. सदर व्यक्तीच्या मृत्यूस गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे गौतमी पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
गौतमी पाटील महाराष्ट्रातील लावणी परंपरेला आणि संस्कृतीला छेद देत अश्लिल नृत्य सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमादरम्यान सादर करत असते. तिचे अश्लिल हावभवाचे व्हिडिओ छोटया व्हिडिओ अॅप व्दारे घराघरात पोहोचतात. घरामध्ये माता भगिणी व लहान मुले मुली याच्यासमोर असे व्हिडिओ नजरचुकीने समोर येतात. नुकतीच गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पब्लिक शाळेच्या छतावर झाडावरती, बसून पहात होते तसेच धिगाणा करत होते. यावेळी दत्तात्रय ओमासे याचा मृतदेह त्याठिकाणी आढळला, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्या आली. परंतु घटनेची सखोल चौकशी करण्यात येवून दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन नृत्य करुन प्रत्येक कार्यक्रमात पब्लिक कडून गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. गौतमी पाटील हिच्या अश्लिल नृत्यामुळे सामाजात लावणी परपरा तसेच महाराष्ट्रातील एक चांगल्या लोककलेचा अनादर केला जात असलयाचे दिसत आहे.
चार दिवसापूर्वी बीड मध्ये ट्रॅफीकची समस्या निर्माण होवून कार्यक्रमादरम्यान दगडफेकसुद्धा झाली होती. त्यामुळे अश्लिल नृत्य सादर करणारी (नर्तीका गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी.अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे. गौतमी पाटील हिच्या अश्लिल कार्यक्रमामुळे महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या