एक्स्प्लोर

Solapur : एमडीसाठी लागणारा 300 किलो कच्चा माल आणि जवळपास 1 हजार लिटर रसायन जप्त, सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

Solapur Drugs : आरोपीनी तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसीत छापा टाकला होता. 

Solapur Drugs : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ड्रग्स (Drugs) प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एमडीसाठी लागणारा 300 किलो कच्चा माल आणि जवळपास 1 हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली. मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसी मधील एस एस केमिकल्स या बंद स्थितीत असलेल्या कंपनीत आरोपीनी हा कच्चा माल ठेवला होता. छाप्यात आढळलेल्या रसयांनाची तपासणी करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांची मदत घेण्यात आली. Dysp अमोल भारती बी फार्मसी आहेत. त्यामुळे केमिकल तपासणीत त्यांची बरीच मदत झाल्याचे पोलीस अधीक्षकानी यांनी सांगितलं..

मोहोळमध्ये मागील काही दिवसात सुरु असलेल्या ड्रग्स प्रकरणनंतर कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ -पाटील हे देखील सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी मोहोळ येथील चिंचोळी परिसरात ड्रग्स निर्मिती करणाऱ्या कंपनीची पाहणी केली. तसेच या प्रकरणशी निगडित काही घटनास्थळी भेट ही दिली. सोलापूर ग्रामीण पोलिसांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन ही केले. सदरील कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळ कारवाई करत 3 किलो 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले होते. जवळपास 6 कोटी रुपये किमत असलेल्या या ड्रग्जसह पोलिसांनी दत्तात्रय लक्ष्मण घोडके आणि गणेश उत्तम घोडके या दोन आरोपीना देखील अटक केली होती. आरोपीनी तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसीत छापा टाकला होता. तिथेच तब्बल 300 किलो एमडीसाठी लागणारा कच्चा माल आढळून आला. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज प्रकरणात सोलापुरातून अटक केलेले आरोपी गवळी बंधू आणि या प्रकरणातील दोन्ही आरोपींचे संबंध असल्याचे देखील समोर आलं आहे. त्यामुळे गवळी बंधुची मुंबईतील पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी सोलापूर पोलीस प्रयत्न करणार आहेत. 

मोहोळ तालुका ड्रग्जचा अड्डा बनतोय का? 

मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंद्याचा मुंबईच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे.   त्याची एकूण किंमत ही 16 कोटी रुपये इतकी आहे. 

या आधी 2016 साली या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती, त्यावेळीही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. आता पुन्हा आठ वर्षांनी त्याच ठिकाणी छापेमारी करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. तसेच आजही सोलापूर पोलिसांनी कावाई करत सहा कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहे. त्यामुळे मोहोळ पुन्हा एकदा ड्रग्जचा अड्डा बनतोय का असा प्रश्न विचारला जात आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget