धक्कादायक! सोलापुरात महिला डॉक्टरची आत्महत्या, पती घराबाहेर जाताच उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजीनगरानंतर आता सोलापूरमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात एका महिला डॉक्टरने आत्महत्या करून स्वत:ला संपवलं आहे.
सोलापूर : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात एका डॉक्टर महिलनेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या महिला डॉक्टरने सात पानांची सुसाईड वाचून संपूर्ण हळहळला होता. डॉक्टर असलेल्या पतीच्या जाचाला कंटाळून या महिला डॉक्टरने स्वत:ला संपवलं होतं. असं असतानाच आता सोलापुरातही आणखी एका महिला डॉक्टरने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. सोलापुरातील या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेवून जीवन संपवलं आहे. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉ. रश्मी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉ. रश्मी बिराजदार या पती आणि दोन मुलांसमवेत राहात होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी त्यांना काम करणाऱ्या व्यक्तीने फोन करून ही घटना कळवली.
डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळली, डॉक्टरांकडून मृत घोषित
घटनेची माहिती होताच संतोष बिराजदार यांनी घराकडे धाव घेतली. डॉ. रश्मी बिराजदार यांना बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरात काय घडलं होतं?
हेही वाचा :