एसटीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं, सोलापुरात मोठा अनर्थ टळला, 70-75 प्रवासी बचावले
एसटी बसच्या (ST Bus) स्टेअरिंगचा रॉड तुटून एसटी रस्त्याच्या खाली गेल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात घडली. यामध्ये 70 ते 75 प्रवासी होते.
Solapur Bus Accident : एसटी बसच्या (ST Bus) स्टेअरिंगचा रॉड तुटून एसटी रस्त्याच्या खाली गेल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात घडली. स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानं चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले होते. मात्र, बस पुढे जाऊन चिखलात रुतली, त्यामुळं मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये 70 ते 75 प्रवासी होते. या अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बाकीचे सर्व प्रवासी हे सुखरुप आहेत.
एसटीतील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी
दरम्यान, ही घटना मंद्रूप-निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्ती जवळ घडली आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही बस सोलापूरहून कुसूरला निघाली होती. यावेळी एसटी, अचानक स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानं चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्यावरून खाली गेल्यानंतर वडाच्या मोठ्या झाडाला घासून चिखलात जाऊन रुतली, त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. अपघातात एसटीचे किरकोळ नुकसान झाले आहे. एसटीतील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
उपचारानंतर जखमींना घरी सोडण्यात आलं
दरम्यान, आठवडी बाजाराचा दिवस असल्याने प्रवाशांची संख्या ही जास्त होती. एसटीमध्ये 70 ते 75 प्रवासी होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, जखमींना मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर जखमींना घरी सोडण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: