एक्स्प्लोर

Pune Porsche Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी आणखी एक षडयंत्र, मृतकांच्या व्हिसेरात दारुचे अंश टाकले; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

Pune Crime News: धनिकपुत्राचा खोटा ब्लड रिपोर्ट तयार करण्याचा डाव फसल्यानंतर आता विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्यासाठी आणखी एक गंभीर षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची (Pune Car Accident) घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर येरवाडा पोलीस आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी उद्योगपती विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या मुलाला वाचवण्यासाठी गंभीर आणि अक्षम्य लपवालपवी, फेरफार केले होते. या सगळ्याविरोधात जनतेने प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्य सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे. या अपघातप्रकरणात विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी आणखी एक षडयंत्र रचण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

अनिल देशमुख यांनी गुरुवारी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारु न पिल्याचा  अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण-तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत, असा धक्कादायक आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलणार का, हे पाहावे लागेल.

कल्याणीनगर परिसरातील या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. हे दोघेजण बाईकवरुन जात असताना विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या भरधाव वेगातील पोर्श कारने त्यांना धडक दिली होती. यामध्ये अनिस आणि अश्विनी या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला येरवाडा पोलिसांनी दिलेली रॉयल ट्रिटमेंट आणि ससून रुग्णालयात धनिकपुत्राची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून ब्लड सॅम्पलची झालेली अदलाबदल जगासमोर आली होती. या सगळ्यामुळे पोलीस यंत्रणा आणि ससून रुग्णालायची प्रचंड नाचक्की झाली होती. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण अग्रवाल कुटुंबीय पोलीस कोठडीत आहे. तर अल्पवयीन मुलगा हा बालसुधारगृहात आहे. 

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात मोठी अपडेट

विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. बाल न्याय मंडळाच्या आवारात झाली पैशांची देवाणघेवाण. रक्ताचे नमुने बदलल्यानंतर पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याच्याकडे ३ लाख रुपये देण्यात आले होते. विशाल अगरवाल याच्या घरातून आलेले पैसे आधी मकानदार आणि त्यानंतर घटकांबळेकडे देण्यात आले. 50 हजार रुपये हे घटकांबळेसाठी तर 2.5 लाख रुपये डॉ श्रीहरी हळनोर यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

पुणे अपघात प्रकरणात बदलेले ब्लड सॅम्पल लाडोबाच्या आईचेच? लेकासाठी ढसाढसा रडणारी शिवानी अग्रवाल बेपत्ता

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Lata Asha Hospital : लता मंगेशकर हॉस्पिटलचं नाव बदलणार, आशा भोसलेंच्या नावाचाही समावेश, हृदयनाथ मंगेशकरांची मोठी घोषणा
लता मंगेशकर हॉस्पिटलचं नाव बदलणार, आशा भोसलेंच्या नावाचाही समावेश, हृदयनाथ मंगेशकरांची मोठी घोषणा

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget