एक्स्प्लोर

Sanjay Rathod  : आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, संजय राठोडांचा उद्धव ठाकरेंना टोला

Sanjay Rathod On Uddhav Thackeray : आपल्या फायद्याचं असेल त्यावेळी उद्धव ठाकरे बोलतात, आणि फायद्याचं नसेल तर गप्प बसतात असं राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं. 

सोलापूर: मराठीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी येत्या अधिवेशनात 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल असा इशारा राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिला. महाराष्ट्रात हिंदी सक्ती धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले असल्याचा दावा संजय राठोड यांनी केला. आता अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी अनेक गोष्टी बाहेर येतील असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राठोड म्हणाले की, "ठाकरे ही केंद्राच्या भूमिकेबाबत कायमच सोयीस्कर पद्धतीने भूमिका घेतात. जेव्हा फायद्याचं असेल तेव्हा बोलायचे आणि फायद्याचे नसेल तेव्हा गप्प बसायचे असे त्यांचे काम असते. आमच्या विदर्भाच्या भाषेत त्याला 'आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे ..' अशी म्हण आहे."

पावसाळी अधिवेशनात सगळं समोर येईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्रिभाषी सूत्रावर योग्य ते स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळातच यावर अभ्यास समिती नेमल्याचं फडणवीसांनी सांगितलं. संजय राऊत यांनी फडणवीसांवर चुकीचा आरोप केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात सगळेच जनतेसमोर येईल असा टोलाही संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 
  
हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चे काढण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चर्चेच्या आवाहनास प्रतिसाद दिल्यास चर्चेतूनच हा प्रश्न सुटेल असा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला.

तरुणीच्या आत्महत्येसंबंधी आरोप

या आधी काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे आजही चांगले संबंध आहेत, त्यांचे आजही मला फोन येतात, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप झाले होते. भाजपने त्यावेळी त्यांच्यावर आरोप केले होते. त्याच प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे संजय राठोड नाराज झाले होते. त्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर संजय राठोड यांनी आपली नाराजी दर्शवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. 

तरुणीच्या आत्महत्येचे आरोप झालेल्या संजय राठोड यांना महायुती सरकारमध्येही मंत्रिपद मिळालं.  त्यावरुनही त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.  

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget