एक्स्प्लोर

आगामी विधानसभा निवडणुकीत जनता तुमचा हिशोब करेल; बाबासाहेब देशमुखांचा शहाजीबापूंना इशारा

आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) जनताच तुमचा हिशोब करेल, अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांनी आमदार शहाजी पाटील यांच्यावर टीका केली.

Dr. Babasaheb Deshmukh : आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) जनताच तुमचा हिशोब करेल, अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांनी आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांना इशारा दिला.  सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हिशोब, गणित घालायला विद्यमान आमदार माहीर आहेत. गेल्या तीस वर्षांपासून अशा हिशोबावरच त्यांची गुजराण केल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले. अशा हिशोबातूनच 1999 ला हेच आमदार जेलवारीही करून आले आहेत. असे हिशोब घालूनच तुम्ही तालुक्यातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राखरांगोळी केल्याचे देशमुख म्हणाले. त्यामुळे हिशोब, गणित घालायच्या भानगडीत पडू नका, असे देशमुख म्हणाले. 

मचं गणित घालायच्या भानगडीत पडू नका

टेंभूच्या पाण्याचे गणित आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं, आमच्या नादाला लागू नका या शब्दात आमदार शहाजी पाटील यांनी माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्यावर टीका करत नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आव्हान दिले होते. या आव्हानाचा डॉ. देशमुख यांनी खरपूस समाचार तर घेतलाच पण आमदार पाटील यांचा उभा-आडवा इतिहासही चव्हाट्यावर मांडत त्यांच्या कारनाम्यांचे वाभाढे काढले. डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, कोण किती पाण्यात आहे हे तालुक्यासह उभ्या राज्याला माहीत आहे. स्व.आबासाहेबांवर टीका करण्याची विद्यमान आमदारांची पात्रता नाही. स्वच्छ, निर्मळ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी म्हणून आबासाहेबांची देशभर ओळख होती. त्यामुळे आमचं गणित घालायच्या भानगडीत पडू नका असे देशमुख म्हणाले.  

तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल

पाण्यासारखे स्वच्छ, निर्मळ जगात काहीच नाही. त्यामळं पाण्यावर तुम्ही बोलणे म्हणजे पाण्याचा अपमान करण्यासारखे आहे. माण नदीचा तळ तुमच्याच बगलबवच्च्यांनी गाठला आहे. तुमच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्याचे इमले हा तळ शोधूनच वाढले आहेत. त्यामुळे आपल्याच जीवनवाहिनीला उघडीबोडकी करून तिला पुन्हा वस्त्र नेसवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीने चार वर्षात तालुका रसातळाला नेल्याचा घणाघाती आरोपही डॉ. देशमुख यांनी केला. आमच्यावर आबासाहेबांचे संस्कार आहेत, ते आम्ही प्राणापणाने जपू.  त्यांचा नातू असल्याचा अभिमान तर आहेच, पण त्यांच्या विचारांचा जागरही तूसभर कमी होऊ देणार नाही. तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, असा इशाराही देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

निधी आणला, परिसर हिरवा केला, आता तरी शहाजीबापूंचं लीड वाढवणार की नाही? भाजप खासदाराचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 12 March 2024ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 8PM 12 March 2025Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Embed widget