Republic Day 2023 : 100 वर्ष जुनं असलेलं इंद्रभवन सजलं, प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेवर आकर्षक रोषणाई
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेवर (Solapur Municipal Corporation) आकर्षक रोषणाई (illumination) करण्यात आली आहे.
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक (Republic Day 2023) दिन आहे. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो. आजच्या दिवशी देशभरता विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेवर (Solapur Municipal Corporation) आकर्षक रोषणाई (illumination) करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन (Indra Bhavan) ही ऐतिहासिक इमारत आहे. या इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. रंगबेरंगी रोषनाईनं सजलेले पाण्याचे कारंजे लक्ष वेधून घेत आहेत.
इंद्रभवन इमारत ही 100 वर्ष जुनी
सोलापूर महानगर पालिकेची इंद्रभवन ही इमारत जवळपास 100 वर्ष जुनी आहे. नुकतचं या इमारतीच्या संवर्धानाचे काम करण्यात आलं आहे. त्यामुळं इमारतीचे मूळ वैभवशाली अधिकच सुंदर दिसत आहे. त्यातच आकर्षक रोषनाई करण्यात आल्यानं इंद्रभवन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन साजरा
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.
डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती
संविधान सभेने 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. त्यांनी 1952 मध्ये पहिली आणि 1957 मध्ये दुसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. राजेंद्र प्रसाद मे 1962 पर्यंत भारताचे राष्ट्रपती राहिले. त्यांचा कार्यकाळ सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वात मोठा आहे.
26 जानेवारी हा एक मोठा सण आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या:
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभर उत्साहाचं वातावरण; विविध कार्यक्रमांचं आयोजन