PM Modi Solapur Visit : पंतप्रधानआठवड्याभरातच पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, 19 जानेवारीला सोलापुरात
PM Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी हे 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करतील.
सोलापूर : देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 19 जानेवारी रोजी सोलापूर (Solapur) दौऱ्यावर येणार आहेत. सोलापुरातील रे नगर येथे 365 एकर जागेवर या प्रकल्प उभारण्यात आलाय. यावेळी पंतप्रधान मोदी हे सुमारे 30 हजार पैकी 15 हजार तयार घरांचे वाटप करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल.
पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत हा घरे बांधण्यात आली आहेत. असंघटित श्रमिक कामगारांना पाच लाखांत त्यांच्या हक्काचे घर या योजनेअंतर्गत मिळेल. मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना घराचे वितरण करत चावी वाटपाचे नियोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या रे नगरचे उद्घाटन अवघ्या काही दिवसावर आल्याने सर्वच लोकार्पण सोहळ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसात आपल्या घराच्या चाव्या मिळणार असल्याने कामगारांना देखील मोठा आनंद आहे.
कशी असणार आहे रे नगर वसाहत?
- एकूण 350 एकर परिसर
- एकूण 834 इमारत
- प्रत्येक इमारतीत 36 फ्लॅट्स
- एकूण 30 हजार कुटुंबासाठी घर
- एकूण 60 मेगावॅट विजेचे प्रकल्प काम सुरु
- 20 मेगावॅटचे काम पूर्ण
- परिसरात 7 मोठ्या पाणी टाकी ज्याची क्षमता 29 mld आहे
- यामुळे 24 तास पाणी पुरवठा शक्य
- परिसरात मलशुद्धीकरण केंद्र
- स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा
- विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडी सोय
- खेळण्यासाठी क्रीडा मैदान
- आरोग्यासाठी हॉस्पिटल
- लोकांच्या रोजगारासाठी व्यवसाय देखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु
देशातील सर्वात मोठी ही कामगार वसाहत नेमकी कशी आहे?
350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी यांनी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणारं आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. सलग 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा रे नगर हा भव्य प्रकल्प साकारला गेला आहे. केवळ डोक्यावर छत नाही तर जगण्यासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत