Vikhe Patil On Raut :संजय राऊत हे स्वत:च स्वत:ला धमकी देतात, राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडवली राऊतांची खिल्ली
Radhakrishna Vikhe Patil On Sanjay Raut : 'संजय राऊत हे स्वत:च स्वतला धमकी देतात,' अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.
Radhakrishna Vikhe Patil On Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसंच त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना धमकी मिळाल्याचं समोर आलं. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राज्यातल्या प्रत्येक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाची असून आम्ही ते चांगल्या पद्धतीने करु," असं विखे पाटील म्हणाले. सोबतच 'संजय राऊत हे स्वत:च स्वतला धमकी देतात,' अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांची खिल्ली उडवली. आज पंढरपूर (Pandharpur) इथे आषाढी यात्रा व्यवस्थापन पाहणीसाठी आले असता विखे पाटील बोलत होते.
शरद पवारांना धमकी, राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजकारण महाराष्ट्राचे असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार...’ अशी धमकी शरद पवार यांना देण्यात आली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. तसंच शरद पवारांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शरद पवार यांना धमकी आली असेल तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस याची कसून चौकशी करतील. ज्याने ही धमकी दिली ते शोधून काढूच."
'संजय राऊत हे स्वत:च स्वत:ला धमकी देतात'
दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊतांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा अन्यथा महिनाभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू, असं ही अज्ञात व्यक्ती म्हणाली. राऊतांनी मुंबई पोलिसांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मात्र धमक्या येऊनही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिलं नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर संजय राऊत हे स्वत:च स्वत:ला धमकी देतात, अशा शब्दात विखे पाटील यांनी राऊतांची खिल्ली उडवली.
VIDEO : Radhakrishna Vikhe Patil : Sanjay Raut स्वत:च स्वत:ला धमकी देतात, विखेंची टोलेबाजी
संबंधित बातमी