एक्स्प्लोर

न्यू राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीच्या मैदानात, महादेव जानकरांच्या अडचणी वाढणार, पिपाणी चिन्हाचा आग्रह, शरद पवार गटासाठी अडचण

न्यू राष्ट्रीय समाज पक्ष (New Rashtriya Samaj Party) या नवीन पक्षाची एन्ट्री झाली आहे. या पक्षाच्या पहिल्या उमेदवारांची यादी देखील सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी जाहीर केली आहे.

New Rashtriya Samaj Party : एका बाजूला महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा राष्ट्रीय समाज पक्ष वेगळी वाट निवडत विधानसभा रिंगणात उतरला आहे. आता अशातच न्यू राष्ट्रीय समाज पक्ष (New Rashtriya Samaj Party) या नवीन पक्षाची एन्ट्री झाली आहे. या पक्षाच्या पहिल्या उमेदवारांची यादी देखील सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी जाहीर केली आहे. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा ही राष्ट्रीय समाज पक्षासारखाच असल्याने  महादेव जानकर यांच्या उमेदवारांच्या अडचणी देखील वाढणार आहेत.

न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं धरला पिपाणी चिन्हाचा आग्रह 

दरम्यान, न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं पिपाणी चिन्हाचा आग्रह धरला आहे. त्यामुळं लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार गटाला पिपाणी पुन्हा अडचणीत आणणारी ठरणार आहे. आपल्या सर्व उमेदवारांसाठी पिपाणी हे चिन्ह न्यू राष्ट्रीय समाज पक्ष घेणार असल्याचे सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी सांगितले आहे.  या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष काशिनाथ पाल असून त्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सर्व धनगर समाजाचे उमेदवार आहेत. राज्यातील धनगर बहुल मतदार संघात पहिले उमेदवार जाहीर केले असून सांगोल्यातून प्राध्यापक आर वाय घुटुकडे यांना उमेदवारी दिली आहे. या पक्षाचे सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी माढा लोकसभेत पिपाणी चिन्ह घेऊन निवडणूक लढवली होती. यावेळी माढा लोकसभेत घुटुकडे यांना तब्बल 58 हजार मतं पिपाणी चिन्हावर मिळाली होती  यावेळी पिपाणी चिन्हावर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेऊनही हे चिन्ह कायम राहिल्यानेआता न्यू राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या सर्व उमेदवारांसाठी पिपाणी हेच चिन्ह मागणार आहे.

राज्याच्या सर्वच भागात राजकीय वातावरण तापलं

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राज्याच्या सर्वच भागात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. मात्र, अनेक छोटे पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहेत. अशातच आज न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत.  दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यवस्त आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणारआहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. 

महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी : महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढणार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Vasant More : ‘शिवसेना-मनसे एकत्रच’, वसंत मोरेंचा दावा
Zero Hour Suraj Chavan : शहराध्यक्षांचा दाव्यावर सुप्रिया सुळे,अजितदादाच खुलासा करु शकतात
Zero Hour Prashant Jagtap : दादांच्या शहराध्यक्षांचा दावा हास्यास्पद, आमच्याकडून कोणताही प्रस्ताव नाही
Wildlife Sighting: Umred Karhandla मध्ये F2 वाघिणीचा ५ बछड्यांसह मुक्त संचार, पर्यटक सुखावले
Leopard Menace : अंबड तालुक्यात बिबट्याची दहशत, ऊसतोड मजुरांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Embed widget