एक्स्प्लोर

शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा कोणाला असणार? आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले...

आबासाहेबांनी (दिवंगत गणपतराव देशमुख) 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण केले. त्याच विचारांचा मी आहे म्हणून मला निवडणून दिल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले.

Babasaheb Deshmukh : सांगोला विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांनी आज आपल्या आमदारकीची शपथ घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आबासाहेबांनी (दिवंगत गणपतराव देशमुख) 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण केले. त्याच विचारांचा मी आहे म्हणून मला निवडणून दिल्याचे बाबासाहेब देशमुख म्हणाले. आता आनंद आहे पण आबासाहेब बघायला नाही ही खंत असल्याचे ते म्हणाले. जनतेची कामं आणि तालुक्याचा विकास हाच अजेंडा असल्याचे देशमुख म्हणाले. 

शेतकरी कामगार पक्ष हा कॅडर बेस पार्टी आहे. कोणासोबत जायचे याबाबतची निर्णय जयंत पाटील (Jayant Patil) आणि कॅडर ठरवेल असेही बाबासाहेब देशमुख म्हणाले. जयंत पाटील परगावी आहे म्हणून चर्च नाही झाली असेही देशमुख म्हणाले. 

मारकडवाडीच्या मुद्यावर काय म्हणाले बाबासाहेब देशमुख?

मारकडवाडीच्या (Markadwadi) मुद्यावर देखील बाबासाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच नेतेमंडळींनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. जनतेची अपेक्षा आणि म्हणणं अधिकाऱ्यांनी ऐकूण घ्यायला हवं असंही बाबासाहेब देशमुख म्हणाले.

तिरंगी लढतीत बाबासाहेब देशमुखांनी मारली बाजी

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा (Sangola Vidhansabha) मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. कारण या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार शहाजीबापू पाटील निवडणूक लढवत होते. तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून दीपकआबा साळुंखे पाटील तर शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, यामध्ये अखेर शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी (Babasaheb Deshmuk) मैदान मारलं आहे. 

आमदार होताच बाबासाहेब देशमुखांनी केली नवीन उपक्रमाची घोषणा 

बाबासाहेब देशमुख यांनी विजयी होताच, ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी त्यांनी हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. बाबासाहेब देशमुख यांनी प्रथमच  विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये ते विजयी झाले आहेत. दरम्यान, बाबासाहेब देशमुख यांनी सुरु केलेल्या या नवीन उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. पर्यावरण रक्षणाची चळवळ वाढवण्याचे काम यामाध्यमातून केलं जाणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार, शेकापच्या युवा आमदाराचा स्तुत्य उपक्रम 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP MajhaSharad Pawar Full Speech : लोकांना नको असताना निवडणूक आयोगाचा EVMसाठी हट्ट का ?Jayant Patil Markadwadi Speech : उत्तम जानकरांचा राजीनाम्याचा शब्द, जयंत पाटील म्हणतात..Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
Sharad Pawar : फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
Nandurbar :गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
Embed widget