(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घरात चोरी करायला आलेल्या चोराला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल
जखमी संशयीत चोरट्याला उपचारासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते . मात्र उपचारादरम्यान या अभिजित केंगारचा मृत्यू झाला
सोलापूर: अकलूजमधील (Akluj) काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष धवल सिंह मोहिते पाटील (Dhavalsingh Mohite Patil) यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोहिते पाटील यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने एक तरुण घुसला होता. त्याला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये (Akluj Police Station) धवलसिंह मोहिते पाटलांसह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अभिजित उत्तम केंगार हा 21 वर्षाचा चोरटा 18 जानेवारी रोजी पहाटे पावणेदोनच्या सुमारास हा चोरी करण्याचे उद्देशाने धवलनगर अकलुज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगाल्याचे आवारात शिरला होता. यावेळी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचे माजी चेअरमन सतिश पालकर , गिरझणी ग्रा प.चे सदस्य मयुर माने ,हिरा खंडागळे व इतर चौघांनी या चोरट्याला पकडून मारहाण केली व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. या संदरभात पोलीस अधिक तपास करत आहे.
उपचारादरम्यान अभिजित केंगारचा मृत्यू
जखमी संशयीत चोरट्याला उपचारासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते . मात्र उपचारादरम्यान या अभिजित केंगारचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अकलूज पोलिसांनी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भादवी 304 , 324, 34 प्रमाणे अकलुज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यातील आरोपी सतिश पालकर मयुर माने यांना अटक करुन न्यायालया समोर हजार केले असता त्यांना 25 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . दरम्यान या प्रकरणी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि इतरांचा शोध पोलिसांनी सुरु केला असून याचा तपास अकलूज डी.वाय.एस.पी सई भुरे पाटील करत आहेत.
सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून ओळख
सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते पुतणे आहेत. नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे ते प्रसिद्धी झोतात आले होते.
हे ही वाचा :
Sharad Pawar : शिंदेंना का त्यांच्या प्रेमविवाहाची काळजी? शरद पवारांनी घेतली थेट सुशीलकुमार शिंदे यांची फिरकी