एक्स्प्लोर

Madha Crime : टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला

Madha Crime : माढ्यात वाळू माफियांनी महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर हल्ला केलाय.

Madha Crime : माढ्याच्या (Madha Crime) प्रांताधिकार्‍यावर वाळू माफीयांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  वाळू माफियांनी प्रांत अधिकाऱ्याची गाडी अडवून शिवीगाळ व धक्काबुक्की केलीये.  महिला प्रांताधिकार्‍यांना वाळू माफीयांनी मध्यरात्री अडवल्याचं समोर आलंय. ही घटना माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ (Tembhurni Crime)घडलीये. या प्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

अधिकची माहिती अशी की, सध्या सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून कारवाई केलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याची मजल या वाळूमाफियांची पोचली आहे. माढा तालुक्यातील वरवडे गावच्या शिवारात अवैध वाळू उपशावर प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर या गेल्या होत्या यावेळी त्यांनी वाळू उपसा करणाऱ्या एका टिप्परवर रात्री कारवाई केली आणि तो जप्त करून परत घेऊन निघाल्या होत्या. हा वाळूचा टिपर घेऊन सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून परत जात असताना वाळू माफी यांनी रात्री साडेबारा ते पावणेदोन दरम्यान प्रांत अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या. प्रांत आणि सोबतचे कर्मचारी जात असताना आण्णा पाटील रा.शिराळ यांने त्यांचे फॉरच्युनर नंबर (एम.एच.42 बी.3396) व आप्पा पराडे यांने त्याची पांढरे रंगाची अलकायझर कार ही आडवी लावून महिला उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या रोखल्या.  यावेळी यातील आरोपी अण्णा पाटील याने महिला प्रांत अधिकाऱ्यांना हाताने धक्का बुक्की केली. यानंतर फिर्यादी किसन बोटे याने टेंभुर्णी पोलीस स्थानकात आरोपी अण्णा पाटील, आप्पा पराडे आणि टिपर चालक गणेश केदार याच्या विरोधात फिर्याद दिली. 

महिला प्रांताधिकारी यांनी केलेल्या कारवाईत वीस लाख रुपयाचा सहा चाकी बिन नंबरचा टिपर आणि 28 हजाराची वाळू जप्त केली होती. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफीयांची कारवाईस आल्यानंतर आता थेट महिला उपजिल्हाधिकारी यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल पोचली आहे. या वाळू माफियांना पोहोचायचे काम काही अधिकारी करीत असल्याने महिला वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला करणे किंवा धमकवण्याची मजल करण्याचे धाडस हे वाळूमाफिया करू लागले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा अवैध वाळू उपशाचा गोरज धंदा राजरोसपणे सुरू आहे. अशा वैद्य कामावर कारवाईला गेलेल्या महिला अधिकाऱ्यावर देखील हल्ला करायला हे माफिया आता घाबरत नसल्याने यावर मोठी सफाई मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. वाळू माफियांवरील कारवाई करताना महिन्यात एखाद्या ठिकाणी छापा टाकला जातो आणि थोडाफार मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले जाते मात्र यावेळी कोणत्याही वाळू माफियांवर गुन्हे दाखल होत नसल्याने या माफी यांची हिम्मत वाढत चालली आहे. आता तरी पोलीस अधीक्षकांनी वाळूसाठी अतिशय कठोर पावले उचलली तरच चांगले अधिकारी शासकीय ध्येयधोरणाप्रमाणे काम करू शकतील. 

आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारायला निघालेल्या जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात कोठेही माफियागिरी अथवा गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी राज्याचे दुसरे मंत्री विखे पाटील यांनी वाळू माफियांवर कारवाई करताना थोडा विचार करा ती आपलीच लोकं आहेत असे विधान करीत वाळू माफियांना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता या वाळू माफियांना व्यसन नाही घातल्यास महिला अधिकाऱ्यांना वाळूवर कारवाई करायला गेल्यावर असे हल्ले सोसावेच लागतील याची जाण जिल्हा प्रशासनाने ठेवावी.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणारAnant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
Embed widget