Pandharpur News: प्रेमप्रकरणातून भरचौकात कोयत्याने वार, वाहतूक पोलिसामुळे पुढचा अनर्थ टळला, विठुरायाचं पंढरपूर हादरलं
Pandharpur News: भर वर्दळीच्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी एकावर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाहतूक पोलीस आल्याने हल्लेखोर फरार झाली असल्याची माहिती आहे.
पंढरपूर: विठुरायाच्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल मंदिराच्या जवळच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने हल्ला झाला आहे. भर वर्दळीच्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी एकावर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाहतूक पोलीस (traffic police) आल्याने हल्लेखोर फरार झाली असल्याची माहिती आहे.
आज (गुरूवारी) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोयत्याने वार झाल्याने खळबळ उडाली. वाहतूक पोलीस आल्याने हल्लेखोर फरार आणि पुढचा अनर्थ टळला. वातूक पोलिस येताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. घटनेतील मोटार सायकल सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. मुलीच्या प्रेम प्रकरणावरून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर जखमी व आरोपी दोघेही पंढरपूर शहरातील डाळे गल्ली भागातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रेमाला विरोध केल्याने प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्यावर कोयत्याने हल्ला करून चुलत्याला जखमी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी शहरातील सर्वात प्रमुख चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. यावेळी पोलिसांनी यातील जखमे चुलत्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमध्ये नाना निमकर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर रस्त्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी नाना निमकर आज सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटारसायकल वरून जात असताना संशयित आरोपी अमित वाठारकर याने धारदार कोयत्याने वार केले. जवळच असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांने घटनास्थळी धाव घेतल्याने जखमीचा जीव वाचला. ही घटना घडताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेत जखमी झालेल्या तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहराच्या अत्यंत प्रमुख चौकात मंदिराजवळ झालेल्या या घटनेने भाविकांमध्ये, दुकानदार आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपीने निर्घृणपणे कोयत्याने वार केले आहेत.
पाचशे रुपये घेतल्याचा संशयातून भावानेच केली भावाची हत्या
पाचशे रुपयासाठी भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. कल्याण मधील रोहिदास वाडा परिसरामध्ये सख्ख्या भावांनेच भावाची पाचशे रुपये घेतल्याच्या रागातून धारदार शास्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. कल्याण पश्चिममधील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहत आहे. नईम शमीम खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून सलीम शमीम खान असं आरोपी भावाचं नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिममधील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहत आहे. या कुटुंबात आईसह तिघे भाऊ राहतात. मोठा भाऊ आरोपी सलीम शमीम खान मयत नईम शमीम खान आणि त्याचा एक भाऊ असे चार जण राहतात. रात्री सलीम याचे पाचशे रुपये नईमने घेतल्याचा संशय सलिमला आल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सलीम याने नईम याच्यावर घरातील स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने वार करत नईमची हत्या करून सलीम फरार झाला. या घटनेची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीला 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.