एक्स्प्लोर

Pune News: तत्काळ सेवा पंधरवडा राबवा, मराठा आरक्षणाची प्रत्येक तालुक्यात किमान 1 हजार प्रमाणपत्र वाटप करा; महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांचा आदेश

Pune News: पंधरवड्यात प्रत्येक तालुक्यात मराठा आरक्षणाबाबत शासनातर्फे जाहीर शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात किमान 1000 प्रमाणपत्र वाटप करण्याच्या आयुक्तांच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे: महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांच्या जीआरमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल विभागाचे पुणे आयुक्त यांच्याकडून तत्काळ सेवा पंधरवडा राबवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. सेवा पंधरवड्यात प्रत्येक तालुक्यात मराठा आरक्षणाबाबत शासनातर्फे जाहीर शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात किमान 1000 प्रमाणपत्र वाटप करण्याच्या आयुक्तांच्या सूचना  आहेत. मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी जीआर लागू करण्यात आला. हैदराबाद गॅझेट केवळ औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीडधाराशिव, हिंगोली, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

महसूल आयुक्त पुणे यांनी मात्र सदर दाखले देण्यासाठी सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला देखील सूचना केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे आयुक्तांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा महसूल कार्यालयाने काढलेले परिपत्रक एबीपी माझाच्या हाती आले आहे. 

काय म्हटलंय परिपत्रकात?

महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळयाच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आगामी जन्मदिन दि. 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत "सेवा पंधरवडा" साजरा करणेबाबतची वाब शासनाच्या विचाराधीन होती. सेवा पंधरवाड्यात राबवावयाचे उपक्रम हे यापूर्वीपासून राबविण्यात येत असून पंधरवड्या दरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे उपक्रम आहेत. मात्र या कालावधीत शासन निर्णय, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई क्र. मराअ-2025/प्र.क्र.63 (ई.ऑ.क्र. 1296378) समन्वय-1दि. 1.9.2025 अन्वये सदर उपक्रम मोहिम स्वरुपात युद्धपातळीवर राववायाचे आहेत.

त्यानुषंगाने मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी दि. 03/09/2025 रोजीच्या बैठकीमध्ये सेवा पंधरवडा प्रभावी पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर. सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व उप अधिक्षक, भूमी अभिलेख यांनी तात्काळ नियोजन करून दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर हा सेवा पंधरवड्याचा कालावधी असला तरी त्यातील विषयांची व्याप्ती लक्षात घेता त्यावर तात्काळ कामकाज सुरु करावे जेणे करुन सेवा पंधरवड्यातील फलनिष्पत्ती संख्यात्मक व गुणात्मकरित्या परिणामकारक होईल. त्यादृष्टीने सर्व संबंधित अधिकारी यांनी खालील विषयाबाबत नियोजन आराखडा तयार करुन आजच या कार्यालयास सादर करावा.

- विवादग्रस्त अविवादग्रसत नोंदी निर्गत करणे, त्याबाबत कॅम्प राबवून दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 पर्यंत विवादग्रस्त नोंदी 10% वर अविवादग्रस्त नोंदी 0.5% वर आणणे,
- दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात सर्व गावांमध्ये 7/12 वाचन करणे.
- गाव तिथे स्मशानभूमी अभियान अंतर्गत ज्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही तेथे बक्षीसपत्र वा ग्रामपंचायत मार्फत - - - - खाजगी जागा अथवा असल्यास शासकीय जागा उपलब्ध करुन देणे.
- शासकीय जमीन land Bank Degitization (Update) करणे.
- मराठा आरक्षणाबाबत शासनातर्फे जाहीर शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात किमान 1000 प्रमाणपत्र वाटप करणे,
- अनुकंपा भरतीची कार्यवाही पूर्ण करणे
- VINT जमातीसाठी विविध प्रकारचे दाखले देणेसाठी कॅम्प आयोजित करणे.
- 29 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे. रस्ते अदालत आयोजन करणे अथवा त्याचे Geo - - -- tagging करणे, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा वाद नाही अशा रस्त्यांची नोंद इतर अधिकारात घेणे. पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे,
- Third gender एकट्या महिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचेसाठी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभदेणे.
- ASSK केंद्र बंद असलेल्या ठिकाणी नवीन वाटप करणे,
- आयुष्यमान भारत कार्ड वाटप कॅम्प आयोजन.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
Embed widget