एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Solapur News : आमदार राजेंद्र राऊत यांची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, उच्च न्यायलयाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आदेश

Rajendra Raut : अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti Corruption Department) दिले आहेत.

Solapur News Update : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत ( Rajendra Raut ) यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti Corruption Department) दिले आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांनी मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमा केली असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार बार्शीतील शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केली होती. मार्च 2021 मध्ये दाखल झालेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने भाऊसाहेब आंधळकर यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. त्याबाबत उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोलापूरमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्याकडे किती केसेस पेंडिग आहेत यासंदर्भात माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या जवळ असलेल्या पेंडिग केसेसची माहिती सादर केल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय पीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि आर. एन. लड्डा यांनी हे आदेश दिले आहेत. 

आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांनी बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे. ही मालमता ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार भाऊसाहेब आंधळकर यांनी 14 मार्च 2021 रोजी केली होती.  "माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन मी  14 मार्च 2021 रोजी जवळपास 17 यंत्रणांकडे तक्रार केली होती. ईडी, आयकर विभाग आणि लाचलुचपत विभागाकडे देखील तक्रार दिली होती. त्यासाठी विवरणाची प्रतिज्ञापत्रे, मालमत्तेचे उतारे, वाहने यांची छायाचित्रे सादर करून वाढलेल्या स्थावर जंगम मालमत्तेचा तक्ता देखील सादर केला होता. मात्र, याबाबत संबंधित विभागाकडून कार्यवाही होण्यास विलंब होत असल्याने उच्च न्यायलयात धाव घेतली होती. उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीवर नाराजी व्यक्त करत तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे." अशी प्रतिक्रिया तक्रारदार भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली. 

मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार : आमदार राजेंद्र राऊत

"माझ्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक तक्रार अर्ज दाखल झाला आहे. तो तीन महिन्यात निकाली काढा असे आदेश उच्च न्यायलयाने दिले आहेत. माझी कुठलीही ईडी किंवा आयकर विभागाची चौकशी होणार नाही. तरी देखील मी माझा उद्योग व्यवसाय करताना प्रत्येक रुपयाचा हिशोब आयकर विभागाला देत असतो. दरवर्षी मी रिर्टन्स भरत असतो. कुठलीही चौकशी झाली तर त्याला सामोरं जायला मी तयार आहे." अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे. 

राऊतांचा  आंधळकरांवर निशाणा

"मी प्रामाणिकपणे राजकारण आणि व्यवसाय करत आहे. त्यासाठी विविध बँकाकडून कर्ज देखील घेतले आहेत. त्यामुळे या चौकशीनंतर तक्रारीत किती तथ्य आहे हे समोर येईल. परंतु, ज्या लोकांनी माझ्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी शासनाला किती बुडवलं. किती दरोडे टाकले, कुठल्या खुनाच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्यावर आयकर विभागाने किती धाडी टाकल्या. आयकर विभागाच्या चौकशीत किती दिवस ते तुरुंगात होते. याचं आत्मपरीक्षण करावे. त्यानंतर माझ्याबाबतीत टीका करावी" असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाऊसाहेब आंधळकर यांच्यावर आमदार राऊत यांनी निशाणा साधलाय.  

महत्वाच्या बातम्या

Pandharpur Maghi Wari : पंढरपूरची माघी यात्रा चार दिवसांवर, पायी दिंड्यांनी दिवसा प्रवास करावा, पोलिस प्रशासनाचं आवाहन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget