(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण, वारकऱ्यांकडून पंढरपूरमध्ये भव्य ग्रंथदिंडीचं आयोजन
तासगाव संस्थांच्या गौरी या हत्तीणीवर नाथ महाराजांचे भागवत ग्रंथाला ठेऊन नामदेव पायरीपासून या सोहळ्याला सुरुवात झाली .
पंढरपूर: पंढरपूरमधून (Pandharpur News) यावर्षी शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्षे पूर्ण झालेत. यानिमित्त आज पंढरपुरात वारकरी संप्रदायाकडून भागवत ग्रंथाची हत्तीवरून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. ही दिंडी पाहण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी फुलांची पुष्पवृष्टी आणि टाळ मृदुंगाच्या जयघोषात भागवत ग्रंथदिंडी काढण्यात आली,
शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ वारकरी संप्रदायाच्या वतीने नामदेव पायरीपासून भागवत ग्रंथाचा हत्तीवरून भव्य ग्रंथदिंडी सोहळा संपन्न झाला . तब्बल 450 वर्षांपूर्वी भागवत ग्रंथाचे काम पूर्ण झाल्यावर श्रीक्षेत्र काशी येथे एकनाथ महाराज आणि भागवत ग्रंथाची अशाच पद्धतीने हत्तीवरून मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला होता. याच दिवसाच्या आठवणीनिमित्त आज वारकरी पाईक संघ आणि इतर वारकरी संघटनांकडून या भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली .
सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी
तासगाव संस्थांच्या गौरी या हत्तीणीवर नाथ महाराजांचे भागवत ग्रंथाला ठेऊन नामदेव पायरीपासून या सोहळ्याला सुरुवात झाली . दोन्ही बाजूने फुलांच्या पुष्पवृष्टीत आणि टाळ मृदूंगाच्या जयघोषात प्रदक्षिणा मार्गावरून भागवत ग्रंथदिंडी काढण्यात आली . यावेळी दुतर्फा हजारो वारकऱ्यांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. या ग्रंथदिंडीचे आयोजन देवव्रत महाराज वासकर आणि भागवताचे गाढे अभ्यासक डॉ भागवत कानडे यांनी केले होते . या सोहळ्यासाठी एकनाथ महाराजांचे 14 वे वंशज योगीराज महाराज गोसावी , संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज , पंढरपुरातील फडकरी , मठाधिपती आणि हजारो वारकरी उपस्थित होते . संत एकनाथ महाराज यांच्या जलसामधील 425 वर्षे तर एकनाथी भागवत ग्रंथास 450 वर्षे पूर्ण झाली आहेत .
विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट
घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास एक टन झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला आहे . या सजावटीमध्ये घटस्थापनेचा महत्व असणारे फुलांचे कुंभ देखील बनविले आहेत .सजावटीमध्ये झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . आज विठ्ठल भक्तांना आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे. रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .