एक्स्प्लोर

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणी; आक्रमक झालेल्या कृती समितीनं विखे पाटलांवर भंडारा उधळला

Maharashtra Solapur News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे. त्यापाठोपाठ आता धनगर समाज आरक्षण कृती समिती धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाली आहे.

Solapur News: सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत असल्यानं धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला आहे. सोलापूर (Solapur News) शासकीय विश्रामगृहात घटना घडली आहे. 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली. सध्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्थानकात या कार्यकर्त्यांना नेण्यात आलं आहे. 

धनगर आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. सरकार केवळ घोषणाच देत आहे, मात्र त्यासंदर्भात कोणतीही अंमलबजावणी करत नाही, असा आरोप धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा आहे. याच मागणीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. 

पाहा व्हिडीओ : Radhakrishna Vikhe Patil Solapur : धनगर आरक्षणाची मागणी,विखे पाटलांवर उधळला भंडारा

धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते म्हणाले की, "शासनाच्या निषेधार्थ... धनगर समाजाच्या प्रश्नांकडे शासनानं कुठेतरी लक्ष द्यावं, यासाठी आम्ही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं, धनगर समाजाची घटनादत्त, एसटी आरक्षण याची अंमलबजावणी त्वरित करावी आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये, अशी आमची मागणी आहे." तसेच, धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं थेट राज्य सरकारला आव्हान करण्यात आलं आहे. येत्या काळात जर आमच्या मागण्या पूर्ण करुन धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही मुख्यमंत्री, मंत्री यांना काळ फासयला धनगर समाज मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
Bondi Beach Terror Attack: ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
Jasprit Bumrah Angry : आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
Ram Sutar Passes Away: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
Embed widget