Dhairyasheel Mohite-Patil : माढ्यात शरद पवारांनी निर्णायक डाव टाकलाच; धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यात गणिते बदलली
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा रंगली होती.
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सर्वाधिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू होती, त्याला आज पूर्णविराम मिळाला असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. धैर्यशील मोहिते पाटील 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झालं आहे. रणजिसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला साताऱ्यातून निंबाळकर आणि सोलापुरातून मोहिते पाटलांनी कडाडून विरोध केला आहे.
विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहितेंना साथ देणार
गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा रंगली होती. कार्यकर्त्यांकडून सुद्धा दबाव सुरू होता. या सर्व पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहणार आहेत. संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवार गटाला साथ देणार आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये राजकीय चित्र पूर्णतः पालटून गेलं आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ देणार आहेत. ते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
20 वर्षांनी शरद पवार- सुशीलकुमार शिंदे-विजयसिंह पाटील एकत्र
धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्ष प्रवेश करण्यापूर्वी शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची निवासस्थानी पोहोचले. अकलूजमध्ये त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सुद्धा पोहोचले. त्यामुळे तिन्ही नेते तब्बल दोन दशकांनी एकत्र आले. विजयसिंह मोहिते पाटलांच्या शरद पवार थेट घरी पोहोचल्याने माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय आणखी वाढणार आहे. सुरुवातीपासून जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील हे शरद पवारांकडे गेल्याने माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता. डिनर डिप्लोमसीसाठी सुशीलकुमार शिंदे सुद्धा पोहोचल्याने सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या