Praniti Shinde: सोलापूरचा खासदार काँग्रेसचाच असणार, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार; लोकसभेच्या उमेदवारीवर प्रणिती शिंदेंचे संकेत
Praniti Shinde On Lok Sabha Election : महापालिकेच्या निवडणुका घ्यायला सरकार घाबरत असल्याचं सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सोलापूर: राज्यातील खोके सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काही पडले नसून जनता निराश झाली आहे. त्यामुळेच या सरकारला जनतेतून पाठिंबा नसल्याने हे सरकार निवडणुकांना सामोरं जायला घाबरत असल्याने महापालिका निवडणूक (Solapur Mahapalika Election) आता बहुदा लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर होतील असा टोला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लगावला. यावेळी काही झाले तरी सोलापूरचा खासदार (Solapur Lok Sabha Election) काँग्रेसचा असेल आणि पंढरपूरचा आमदारही लोकशाही आघाडीचा असेल असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
पंढरपूर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आल्या असता त्या बोलत होत्या. आपणावर पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती आपण पार पाडू अशा शब्दात त्यांनी सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत दिले. यावेळी काही झाले तरी सोलापूरचा खासदार काँग्रेसचा असेल आणि पंढरपूरचा आमदारही लोकशाही आघाडीचा असेल असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
सरकार निवडणुकांना सामोरे जायला घाबरते
सरकारच्या विरोधात लोकमत असल्याने ते महापालिकेच्या निवडणुका घ्यायला घाबरत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली. त्यामुळे या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेनंतर होतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
मर्जीतील ठेकेदारांना महाराष्ट्र विकला जातोय
राज्यातील कंत्राटी भरतीवरून सरकारवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सध्याचे राज्य सरकार हे सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिंदू नामावली आणि आरक्षण रद्द करण्याचे कट कारस्थान सुरु असून हे सरकार त्यांच्या मर्जीतील सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकत आहे. एका बाजूला नोकऱ्या देण्याचे आश्वासन देताना दुसऱ्या बाजूला कायम नोकऱ्यांचे खासगीकरण करून हे सरकार त्यांच्या ठराविक लोकांसाठीच महाराष्ट्र विकण्याचे काम करत आहे. त्याच्या विरोधात काँग्रेस आवाज उठवणार.
महाराष्ट्रात रेशन दुकानात धान्य मिळत नाही, सिलेंडरचा भाव वाढला आहे, शेतकरी, कामगार आणि एकंदरीत जनता या सरकारमुळे निराश आणि हताश झाली आहे. अशावेळी महाराष्ट्राला स्थिर आणि चांगले सरकार महाराष्ट्र लोकशाही आघाडीच देऊ देईल असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवला.
सोलापुरातून भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींच्या विरोधात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
