Bachchu Kadu : नांदेडमधील दिव्यांग बांधवाच्या फोनचा रिचार्ज तर माढ्यातील मुलीला स्मार्टफोन; बच्चू कडू यांचा दिलदारपणा
Bacchu Kadu News : दिव्यांग बांधवासाठी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कायमच कौतुक होत असतं. नुकत्याच केलेल्या दोघ कृतींमधून आमदार बच्चू कडू यांचे दिव्यांग बांधवांवरील प्रेम पुन्हा पाहायला मिळाले.
Bachchu Kadu News : दिव्यांग बांधवासाठी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कायमच कौतुक होत असतं. बच्चू कडू नेहमीच दिव्यांग (Divyang) बांधवांच्या अनेक अडचणी सोडवण्याच्या प्रयत्नात असतात. कालच (22 फेब्रुवारी) नांदेडमधील (Nanded) एका दिव्यांग बांधवाच्या फोनचा रिचार्ज (Recharge) करुन बच्चू कडू यांनी त्याची अडचण सोडवली होती. त्यानंतर आता सोलापूरच्या माढा (Madha) तालुक्यातील एका दिव्यांग मुलीला बच्चू कडू यांनी स्मार्टफोन (Smartphone) भेट दिला. या कृतीतून आमदार बच्चू कडू यांचे दिव्यांग बांधवांवरील प्रेम पुन्हा पाहायला मिळाले.
मुलीला स्मार्टफोन भेट म्हणून दिला
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील माने गावात राहणाऱ्या नयना जोकर या दिव्यांग मुलीने कुटुंबीयांकडे स्मार्टफोनसाठी तगादा लावला होता. मात्र कुटुंबाची ऐपत नसल्याने ते स्मार्टफोन घेऊ शकत नव्हते. दरम्यान ही बाब बच्चू कडू यांना समजताच त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर एका तासाच्या आत बच्चू कडू यांच्याकडून स्मार्टफोन त्या दिव्यांग मुलीला घरपोच देण्यात आला. स्मार्टफोन भेट मिळाल्यानंतर दिव्यांग मुलीने देखील आनंद व्यक्त केला. मुलीने नव्याने भेट मिळालेल्या स्मार्ट फोनवरुन आमदार बच्चू कडू यांना फोन करुन धन्यवाद दिले. या घटनेमुळे आमदार बच्चू कडू यांचे दिव्यांग बांधवावरील प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
VIDEO : Bachchu Kadu : दिव्यांग मुलीचा पालकांकडे स्मार्टफोनचा हट्ट, बच्चू कडूंनी एका तासात पूर्ण केली इच्छा
दिव्यांग बांधवाचा फोन रिचार्ज केला
तर नांदेडमधील एका दिव्यांग बांधवाची अडचण सोडवतानाचा बच्चू कडू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बच्चू कडू हे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात प्रवास करत असताना त्यांना काल (22 फेब्रुवारी) सकाळी नांदेड जिल्ह्यातील मोसखेळ गावातील ओंकार चव्हाण या दिव्यांग बांधवाचा फोन आला. बच्चू कडू यांनी हा फोन घेतला आणि त्याची विचारपूस सुरु केली. यानतंर त्या दिव्यांग बांधवाने मोबाईलमधील रिचार्ज संपला असून रिचार्ज करून द्या, असा आग्रह धरला. यानंतर बच्चू कडूंनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत माहिती विचारली आणि लगेचच त्याच्या फोनवर 200 रुपयांचा रिचार्ज केला. बच्चू कडू यांच्या या दिलदारपणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO : Bachchu Kadu on Recharge : फोनच्या रिचार्जसाठी बच्चू कडूंना दिव्यांग बांधवाचा फोन ABP Majha
आमदार बच्चू कडू हे दिव्यांग बांधवांना नेहमीच मदत करत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली आहे. शिंदे सरकारने या मंत्रालयाच्या स्थापना करुन दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा दिला आहे.