माढ्यात अजित पवारांच्या भाषणावेळी गोंधळ; सभेवेळी मराठा आंदोलकाने दाखवले काळे झेंडे, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
अजित पवारांच्या उपस्थितीत विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळप हंगाम कार्यक्रमात ते बोलत होती. मात्र अजित पवारांच्या भाषणावेळ एका मराठा आंदोलकाने काळे झेंडे दाखवले
सोलापूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी राज्यातील मराठा समाज तापला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची माढ्यात आज सभा पार पडली. मात्र, सभा सुरु झाल्यानंतर सभेत अनेक गोष्टी घडल्या. लोकांनी सभेला उपस्थित राहून प्रतिसाद तर दिला. अजित पवारांच्या उपस्थितीत विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळप हंगाम कार्यक्रमात ते बोलत होती. मात्र अजित पवारांच्या भाषणावेळ एका मराठा आंदोलकाने काळे झेंडे दाखवले
अजित पवारांच्या उपस्थितीत विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळप हंगाम कार्यक्रम पार पडला . अजित पवारांच्या भाषणावेळ एका मराठा आंदोलकाने काळे झेंडे दाखवले. या वेळी आंदोलकाला पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरून लहगेच ताब्यात घेतले. मराठा आंदोलकांचा अजित पवारांवर रोष आहे. पिंपळनेर कारखाना कार्यक्रमासाठी अजित पवारांना येण्यास आंदोलकांनी येण्यापूर्वीच विरोध केला केला होता.
अजित पवारांना सभेपूर्वीच इशारा
अजित पवार माढा इथे बबनदादा शिंदे यांच्या पिंपळनेर साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी आले होते. मात्र सकल मराठा समाजाने त्यांना येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. माढा पोलिसांना तसा अर्ज दिला आहे.त्यानंतरही अजित पवारांची सभा पार पडली आहे. आज शरद पवार देखील माढा दौऱ्यावर होते मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. सर्वात महत्त्वाचे मराठा समाजाचा विरोध हा फक्त अजित पवारांना होता. शरद पवारांसाठी जोरात तयारी करण्यात आली होती.
फडणवीसांनी दिलेले आरक्षण हायकोर्टात टिकले मात्र सुप्रीम कोर्टात टिकले नाही
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही 16 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. आम्ही दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही मात्र फडणवीसांनी टिकणारं आरक्षण दिलं होतं . मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आरक्षणासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे. या प्रश्नावर सर्व राजकिय पक्षांसोबत बैठक घेतली. मागणी करण्याचा अधिकार आहे. आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. राज्यात जातनिहाय गणना झाली पाहिजे. जातनिहाय गणनेनंतर समाजासमोर चित्र स्पष्ट होईल. आम्ही सर्वांना आरक्षण देण्याच्या बाजूने आहे.
संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच. सरकार मात्र आरक्षणापासून पळत आहे. स्वत:ला मराठा समजणारे अजित पवार आरक्षणापासून दूर का पळत आहे? असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. आरक्षणासाठी किती बळी घेणार असा संतप्त सवाल देखील संजय राऊतांनी केला.