एक्स्प्लोर

सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान

गृहनिर्माण विभागाने म्हाडाकडून हा प्रस्ताव मागवून मान्यतेसाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे पाठविला होता.

सोलापूर : सोलापुरातील पत्रकारांसाठी असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र निवारा निधीतून 7 कोटींचा निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर (Solapur) श्रमिक पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. पत्रकारांसाठी असलेल्या गृहप्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी या निधीच्या माध्यमातून सोयी-सुविधा उभारण्या येणार आहेत.

मंगळवारी, होम मैदान येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख, मराठी पत्रकार संघाचे खजिनदार अभिषेक आदेप्पा, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे,  राज्य अधिस्वीकृती  समितीचे सदस्य प्रमोद बोडके आदींच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा स्वामी समर्थांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी सात कोटींचा निधी मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्रकार संघटनेनी केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला दिले होते. गृहनिर्माण विभागाने म्हाडाकडून हा प्रस्ताव मागवून मान्यतेसाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे पाठविला. सावे यांच्या मान्यतेनंतर सदरचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. हा निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या माध्यमातून तर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्री सावे यांच्याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मिळाला आहे. 

दरम्यान, या निधीतून नाला बांधकाम, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, भराई, पेव्हिंग ब्लॉक, पावसाळी गटार, मल निस्सारण वाहिनी, पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पथदिवे, बाह्य विद्युतीकरण, सोलार सिस्टिम व अन्य कामे करता येणार आहेत. या निधीमुळे घरांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान  पत्रकारांचा हा महत्वाकांशी गृहप्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा या मागणीचे निवेदन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना देण्यात आले.

हेही वाचा

ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : अपघातात आईचा जीव गेला; मुलीची उद्विग्न प्रतिक्रियाAjit Pawar Meet Amit Shah : अमित शाहांशी ऊसाच्या प्रश्नावर चर्चेसाठी आलो - अजित पवारDevendra Fadnavis meet PM Narendra Modi : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोदींची भेटCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Embed widget