एक्स्प्लोर
देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एकाच परिवारातील सहा जणांचा मृत्यू
देवदर्शनासाठी जात असलेल्या एका परिवारावर हा अपघात काळ बनून आला. या भीषण अपघातात एकाच परिवारातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर : जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या बार्शी तालुक्यातील वैरागच्या एका परिवारावर काळाने घाला घातला. वेळापूरजवळ झालेल्या होंडा सिटी आणि ट्रकच्या अपघातात जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या वैराग येथील फलफले कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला तर या अपघातात पाच वर्षाची चिमुरडी सुदैवाने बचावली.
माहितीनुसार वैराग येथून जेजुरीकडे देवदर्शनासाठी निघालेल्या फलफले यांच्या होंडा सिटी कारला सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरने धडक दिली. या अपघातात कारमधील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून देन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पाच वर्षाची चिमुरडी सुदैवाने बचावली असून टँकरने चालक अपघातानंतर पळून गेला आहे. आज सकाळी वैराग येथील फलफले कुटुंब जेजुरी येथे पूजा व देवदर्शनासाठी निघाले होते. वेळापूरच्या थोडे पुढे आल्यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरने या कारला जोरदार धडक दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार हा टँकर चुकीच्या बाजूने येऊन या कारला धडकला असून यानंतरही तो कारला पुढे ढकलत जात होता. या जोरदार धडकेमध्ये कारमधील शिवराज नागेश फळफळे ( 38 ) , दीनानाथ उर्फ बाबा नागेश फलफले (35) , वनिता शिवराज फलफले ( 30 ) , उत्कर्ष शिवराज फलफले ( 9 ) , उत्कर्षा शिवराज फलफले ( 11 ) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या दोन महिला आणि एका लहान मुलीला अकलूज येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान यातील पार्वती महादेव फलफले (80) यांचाही मृत्यू झाला.
उपचार सुरु असलेल्या पूजा दीनानाथ फलफले या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात जखमी झालेली चिमुरडी सह्याद्री ( 5) आता धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर चालक झारखंडचा असून त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. आपली कोणतीही चूक नसताना देवदर्शनासाठी निघालेल्या फळफळे कुटुंबावर काळाने घाला घातला.
फलफले कुटुंबीय सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे राहायचे. आजवर केवळ फलफले कुंटुबियांमुळे वैरागच्या संतनाथ भूमीत अनेकांना मदत मिळाली. अशा दातृत्व असलेल्या परिवारावर काळाने घाला घातल्याने सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement