Health Tips : चमकदार त्वचेसाठी 'या' स्किन केअर रूटीनला फॉलो करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Skin Care Tips : रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने त्वचेला अनेक पटींनी फायदा होतो.
Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी तुम्ही दिवसा त्वचेची काळजी घेता. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळीही त्वचेची काळजी घेणं गरजेचे आहे. रात्री घेतलेल्या काळजीमुळे त्वचेला अनेक पटींनी फायदा होतो. दिवसभराचा थकवा आणि त्वचेला झालेले नुकसान दूर होऊन त्वचा दुसऱ्या दिवसासाठी तयार होते. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला नाईट स्किन केअर रूटीनच्या काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही चमकदार त्वचा सहज मिळवू शकता.
रात्री 'अशी' घ्या त्वचेची काळजी
क्लिंजर - झोपण्यापूर्वी त्वचेची निगा राखण्यासाठी, सर्वप्रथम आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. हे अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकते. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार कोणत्याही प्रकारचे क्लिंजर वापरू शकता.
फेस टोनर - यानंतर फेस टोनर किंवा फेस मिस्ट त्वचेवर लावा. टोनर किंवा मिस्ट वापरल्याने त्वचेवर असलेल्या छिद्रांचा आकार कमी होतो. हे त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्याचे काम करते, ते त्वचेला हायड्रेट ठेवते. जर तुमच्याकडे फेस टोनर नसेल तर तुम्ही गुलाबजल देखील वापरू शकता.
फेस सीरम - तुम्ही फेस सीरम वापरता. हे त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. सीरम हातावर लावा आणि हातांच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. झोपण्यापूर्वी फेस सीरम लावल्याने ते त्वचेला नीट करण्याचे काम करते.
मॉइश्चरायझर - रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर केल्यानंतर झोपा. खरंतर, रात्री झोपताना त्वचेच्या पेशी काम करतात आणि खराब झालेली त्वचा दुरुस्त करतात. अशावेळी सकाळपर्यंत त्वचा डिहायड्रेट होते. जर तुम्ही रात्री मॉइश्चरायझर लावून नीट झोपत असाल तर सकाळी तुमची त्वचा अधिक तजेलदार दिसेल. तुमच्या त्वचेनुसार तुम्ही चांगल्या ब्रँडचे फेस मॉइश्चरायझर वापरू शकता.
लिप बाम - शेवटी चेहऱ्यासोबतच ओठांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच तुम्ही लिप बाम लावून झोपता. तुम्ही घरामध्ये असलेल्या खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने ओठांची काळजी घेऊ शकता किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही चांगल्या ब्रँडचे लिपबाम देखील निवडू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल