एक्स्प्लोर
Advertisement
राज्याप्रमाणे देशातही कोरोनाबाधितांच्या संख्येत घट.. रोजचा आकडा 65 हजारांपेक्षा कमी
भारतात दरदिवशी वाढणारी कोरोना रुग्णांची संख्य़ा आता 65000 च्या खाली आली असून सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या 61,267 इतकी वाढली तर मृतांच्या संख्येत 884 जनांची भर पडल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येचा चढता आलेख आता उतरत आहे ही दिलासादायक बातमी आहे.
नवी दिल्ली: रोजची वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी 65,000 च्या खाली आली असून एकुण बरे झालेल्य़ा रुग्णांची संख्या आता 56 लाखांच्या वर पोहचली आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत एका दिवसात 61,267 नव्या रुग्णाची भर पडली असुन देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 66,85,082 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 1,03,569 इतकी झाली आहे.
बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्य़ा 56,62,490 इतकी झाली आहे.तर देशभरात कोरोनाच्या 9,19,023 अॅक्टिव केसेस् असून ही संख्या एकूण रुग्णांच्या 13.75 टक्के इतकी आहे. कोरोनाच्या संसंर्गामुळे होणाऱ्या मृतांचे प्रमाण हे 1.55 टक्के इतके आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्येने 17 ऑगस्ट रोजी 20 लाखांचा टप्पा ओलांडला तर 23 ऑगस्ट रोजी 30 लाखांचा टप्पा ओलांडला. 5 सप्टेंबर रोजी ती संख्या 40 लाख तर 16 सप्टेंबरला 50लाख तर 28 सप्टेंबर रोजी कोरोना रुग्णांच्या संखेने 60 लाखांचा टप्पा ओलांडला.
आयसीएमआरच्या अहवालानुसार 5 ऑक्टोबर पर्यंत एकूण 8,10,71,797 इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा असून सोमवारी एका दिवसात 10,89,403 इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
याआधी रविवारी प्रकाशित केलेल्या आपल्या सप्टेंबर महिन्या्च्या आढवा अहवालात केंद्रीय अर्थमंत्रालयाने भारतात कोरोनाने कदाचित याआधी कोरोनाने त्याच्या तीव्रतेसंबंधी सर्वोच्च अवस्था गाठली असून आता त्याच्या प्रादुर्भावाची घसरण सुरु झाल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर अनलॉक आणि सरकारी पॅकेज यामुळे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा दावा केलाय. महाराष्टातही गेल्या पाच दिवसात राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळाली आहे. काल राज्यात 10 हजार 244 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील आणि राज्यातील कोरोना रुग्णांचा चढता आलेख आता उतरत आहे ही दिलासादायक बातमी आहे.
कोरोनावर भारतात लस कधी उपलब्ध होणार याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 2021 च्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारला कोरोना लसीचे 400 ते 500 कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत 25 कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल असं अनुमान आहे. केंद्र सरकार कोरोना आजारावर नियंत्रणासाठी 24 तास काम करत आहे. तसंच कोरोनाची लस आल्यानंतर त्याच्या वितरण प्रणालीसाठी देखील काम सुरु आहे. आमची प्राथमिकता आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस कशी दिली जाईल. कोरोना लसीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ञांनी कमिटी देखील कार्यरत आहे, असं यापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधीत बातम्या:
भारतात कोरोना प्रादुर्भावाने शिखर गाठून उतरण सुरु झाल्याची शक्यता.. अर्थमंत्रालयाचा अहवाल
जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण होण्याचं अनुमान : डॉ हर्षवर्धन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement