(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg News : कोकणात उष्णतेचा जलस्त्रोतांवर परिणाम, कुडाळच्या पाट तलावातील पाणी पातळीत घटल्याने पक्ष्यांना फटका
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील पाट तलाव हे पक्षांसाठी नंदनवन म्हणून ओळखलं जातं. मात्र यावर्षी उष्णेतेमुळे पाट तलावातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.
Sindhudurg News : राज्यासह कोकणात उष्णता (Heat) वाढली असून या उष्णतेचा परिणाम जलस्रोतांवर होत आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळमधील पाट तलाव (Pat Lake) हे पक्षांसाठी नंदनवन म्हणून ओळखलं जातं. मात्र यावर्षी उष्णेतेमुळे पाट तलावातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत तलावातील पाणीसाठा उपलब्ध राहिल की नाही याची चिंता पक्षीप्रेमींना सतावत आहे. या पाट तलावात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी असून पावसाळ्याच्या तोंडावर निघून जातात. मात्र उष्णतेची झळ यावर्षी पक्षांनाही जाणवणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने या पाट तलावात देश विदेशातील स्थलांतरित पक्षी येतात. मात्र यावर्षी सतत बदलत्या वातावरणामुळे 10 ते 15 टक्केच पक्षी पाट तलावात दाखल झाले. मात्र यावर्षी कोकणात तापमानाचा पारा चढला असून याचा फटका पक्षांनाही बसत आहे.
10 ते 15 टक्केच पक्षी पाट तलावात दाखल
कोकणातील सिंधुदुर्गच्या कुडाळमधील पाट तलाव हे पक्षांचं नंदनवन म्हणून ओळखले जाते. शेकडो जातीचे पक्षी स्थलांतर करुन देश विदेशातून या पाणवठ्याच्या ठिकाणी हिवाळ्यात येतात. मात्र यावर्षी बदलत्या वातावरणामुळे पक्षांनी पाट तलावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे 10 ते 15 टक्केच पक्षी याठिकाणी दाखल झाले. मात्र यावर्षी कोकणात तापमानाचा पारा चढला आणि या तलावातील पाणी पातळीत झपाट्याने घट होऊ लागली. याचा परिणाम थेट पक्षांना होणार आहे.
उष्णतेमुळे पाट तलावाच्या पाणी पातळीत घट
राज्याप्रमाणे कोकणातही उष्णतेची लाट आहे. याचा परिणाम कोकणातील पाणसाठ्यांवर होत आहे. सिंधुदुर्गात उष्णतेचा पारा 40 च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. याचा परिणाम पाट तलावातील पाण्यावर सुद्धा झाला आहे. या पाट तलावात दरवर्षी हजारोंच्या संख्येने पक्षी मार्गक्रमित होतात आणि पुढील 3 ते 4 महिने या पाट तलावात वास्तव्य करतात. मात्र सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने होणारी घट हा पक्षीप्रेमींमध्ये चिंतेचा विषय बनला आहे.
सध्या कोणकोणत्या पक्ष्यांचं पाट तलावात वास्तव्य?
मध्य युरोप आणि आशिया खंडातील पक्षी पाट तलावात सध्या वास्तव्याला आहेत. यात जांभळी निळी पाणकोंबडी, अडई बदक, खरगोशा यासारखे पक्षी समूहाने शेकडोच्या संख्येने आहेत. त्यामुळे उष्णतेमुळे पाट तलावातील पाणीसाठा पक्षांना मे महिन्याअखेर पुरेल का? असा प्रश्न पक्षीप्रेमींना सतावत आहे.
हेही वाचा