गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरुन सेवा सुरळीत करणार आणि फेऱ्याही वाढवणार; रवींद्र चव्हाण यांची माहिती
Sindhudurg News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विमानाच्या जादा फेऱ्या सुरु करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन (Chipi Airport) सध्या सुरु असलेली विमान सेवा गणेशोत्सवापूर्वी (Ganesh Utsav 2023) नियमित आणि सुरळीत होईल. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विमानाच्या जादा फेऱ्या सुरु करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. सध्या चिपी विमानतळावरुन सुरळीत विमान सेवा (Air Service) प्रवाशांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
पुरेशी प्रमाणात विमानसेवा सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणार
चिपी विमानतळावरुन सध्या आठवड्यातून तीन ते चार विमान उड्डाण करतात. मात्र मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे अनेक वेळा विमानाची उड्डाणं रद्द देखील होतात. याबाबत बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, "सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात येतात. यामुळे रोजगार संधी विस्तारण्यासोबतच स्थानिक प्रवाशांच्या सोयीच्यादृष्टीने चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल." याशिवाय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
कसं आहे चिपी विमानतळ?
सिंधुदुर्गात जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणे व पर्यटनाचा विकास करणे या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. 274 हेक्टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीचे आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लँडिंगची ही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी आहे. 10 हजार चौरस मीटरचे टर्मिनल काम असून सुमारे 180 प्रवासी क्षमतेची विमाने या ठिकाणी उतरु शकतात. त्याशिवाय एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवर विमानांना उतरण्यास आणि उड्डाणास मदत करतो. विमानांना दिशा कळवण्याचे कामही टॉवर करतो. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.
हेही वाचा
Sindhudurga News: सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून आठवड्यातून केवळ चारच दिवस टेक ऑफ, तेही रामभरोसेच