एक्स्प्लोर

Sindhudurg Accident : रिक्षाची झाडाला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील सहा जण जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश

Sindhudurg Accident : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्याच्या खांबाळे येथे रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे.

Sindhudurg Accident : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी (Vaibhavwadi) तालुक्यातील खांबाळे येथे एक दुर्दैवी रिक्षा अपघात झाला आहे. या अपघातात सोनाळी गावातील एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, रिक्षाचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुजल भोसले हे आपल्या कुटुंबातील पाच जणांना घेऊन रिक्षाने वैभववाडीहून फोंड्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, खांबाळे येथील आदिष्टी मंदिराजवळ रिक्षा अचानक झाडावर आदळली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात धडकली. 

जखमींची नावे पुढीलप्रमाणे 

सुशांत भोसले 

स्नेहांश भोसले (गंभीर जखमी)

स्वप्नील भोसले

सुजल भोसले (चालक)

योगेश भोसले

सोजवी भोसले

यामधील स्नेहांश भोसले, जो चालकासोबत पुढच्या भागात बसलेला होता, तो गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचारानंतर कणकवली आणि ओरोस येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अपघात घडल्यानंतर खांबाळे गावातील तरुणांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. त्यांनी रिक्षामध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. अपघाताची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.  

धावत्या स्कूल व्हॅनमधून तीन विद्यार्थी पडले

दरम्यान, अंबरनाथमध्ये  धावत्या स्कूल व्हॅनमधून फातिमा स्कूलचे तीन विद्यार्थी खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांना किरकोळ तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्कूल व्हॅनचा चालक अंबरनाथच्या महामार्गावरून भरधाव वेगाने स्कूल व्हॅन घेऊन जात असताना मागचा दरवाजा अचानकपणे उघडला आणि त्यातून तीन विद्यार्थी खाली पडले. मात्र, या स्कूल व्हॅन चालकाच्या हे लक्षात आले नाही, त्यामुळे तो पुढे निघून गेला. जखमी झालेल्या तीनही विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kolhapur : म्हशी घ्यायला 7 लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या 'फ्री फायर गेम'मुळे पाच लाख उडाले, कोल्हापुरात सायबर 'डल्ला'

Solapur Crime News : दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोचा चार्जरच्या वायरनं गळा घोटला, नंतर स्वतःच्या गळ्याला दोरी लावली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं  
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं  
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
Embed widget