Rice Farming : निसर्गाच्या अवकृपेमुळं कोकणातील भातशेती अडचणीत, अतिवृष्टीमुळं भाताच्या परागीकरणावर परिणाम
सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळं भातामध्ये परागीकरण होताना हा पाऊस पडत असल्यानं भाताचे दाणे भरत नाहीत. परिणामी याचा भाताच्या उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना
Rice Farming : भातशेती (Rice Farming) हे कोकणातील (Konkan) प्रमुख पीक आहे. कोकणात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. 120 ते 140 दिवसांच्या या भातशेतीचा कालावधी असतो. भात पेरणी, लावणी आणि त्यानंतर रोपांना तग धरण्यासाठी पावसाची आवश्यक असते. परंतू, त्यानंतर भाताला फुलोरा येताना पावसाची आवश्यकता नसते. याकाळात पाऊस झाल्यास तांदूळ भरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळं भात उत्पादनात घट होऊन नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळं भातामध्ये परागीकरण होताना हा पाऊस पडत असल्यानं भाताचे दाणे भरत नाहीत. याचा भाताच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उत्पादनात घट होणार
कर्ज काढून भाताचे बियाणे, खते विकत आणतो. भात शेतीवर वर्षांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र अतिवृष्टीमुळे कोकणातील भात शेती ऐन हंगामाच्या काळात अडचणीत आली आहे. सध्या भातशेतीत परागीकरण होण्याची वेळ असते. यावेळी जर पाऊस भाताच्या फुलोऱ्यावर पडला तर परागीकरण होत नाही. परिणामी भाताचा दाणा बनण्याची प्रक्रिया खुंटते. त्यामुळे भात चिंम अर्थात पोल भात होत आहे. ज्यामुळं भाताचा दाणा तयार होत नाही. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अतिवृष्टीमुळं भातशेती फुलोऱ्याला आली असताना त्याचा भातात परिवर्तन न होता भात पोल होत आहे. परिणामी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळं उत्पादनाच झालं नाही तर खायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
भात ऐन फुलोऱ्यात आला अलतानाच अतिवृष्टी
भात शेती हे एक हळवं पीक असतं. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी वाया जाते आणि कमी पाऊस झाला तरी भात शेती वाया जाते. कोकणातील भातशेती निसर्गावर अवलंबून आहे. सध्या कोकणातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर्षी आतापर्यंत भातशेती चांगली झाली होती. शेतकरी आपल्या शेतात पिकणाऱ्या पिवळ्या सोन्याकडे लक्ष लावून होते. मात्र भात ऐन फुलोऱ्यात आलं असताना परागीकरण काळात अतिवृष्टीमुळं हातातोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतला जात आहे. त्यामुळं कोकणातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. कोकणात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. हा अति पाऊस पिकांना धोकादायक ठरत आहे. आजही कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: