![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तुमच्यातील खरा माणूस अनेकांना समजलाच नाही; नारायण राणेंच्या शपथविधीनंतर निलेश राणेंची भावनिक पोस्ट
Nilesh Rane Emotional Post : निलेश किंवा नितेशला सांभाळा असं तुम्ही कधीच सांगितलं नाही, कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या.
![तुमच्यातील खरा माणूस अनेकांना समजलाच नाही; नारायण राणेंच्या शपथविधीनंतर निलेश राणेंची भावनिक पोस्ट nilesh rane viral social media post emotional tweet on narayan rane political journey after oath taking ceremony kokan sindhudurg marathi news तुमच्यातील खरा माणूस अनेकांना समजलाच नाही; नारायण राणेंच्या शपथविधीनंतर निलेश राणेंची भावनिक पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/63a1518f18065d95f0f1a720d6930b41171931970012293_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तुम्हाला सगळी पदं सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. तसेच खासदारकीची पाच वर्षे जीव तोडून कोकणासाठी काम करणार असल्याचंही निलेश राणे यांनी सांगितलं.
भाजपचे नवनियुक्त खासदार नारायण राणे यांनी संसदेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणेंनी एक पोस्ट लिहून नारायण राणेंचा नगरसेवक, आमदार ते खासदारकीपर्यंतचा प्रवास मांडला.
काय आहे निलेश राणेंचे ट्विट? (Nilesh Rane Emotional Post)
1985 नगरसेवक, 1990 ते 2014 सलग सहा वेळा आमदार (1 पोटनिवडणूक), 2014 ते 2024 विधानपरिषद 1 वेळा, राज्यसभा 1 वेळा आणि 2024 आज लोकसभा खासदार.
ही सगळी पदं सहज आली नाही, त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही.
तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही. पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोक इतके वर्षे जोडून ठेवणं सोपं नाही.
जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही की निलेश, नितेशला सांभाळा. कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही.
कोकणाने आणि खासकरून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार.
तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे.
१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) June 25, 2024
ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून… pic.twitter.com/d2w8qy8ohL
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)