Maharashtra Sindhudurg news : तळकोकणातील केर गावाला हत्तींचा गेल्या चार महिन्यापासून वेढा; शेती करायची की नाही? गावातील शेतकरी चिंतेत
Maharashtra Sindhudurg news : हत्तीनं केर या गावात धुडगूस घातला आहे. यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी हतबल झाले आहेत.
Maharashtra Sindhudurg news : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील केर या गावाला गेले तीन-चार महिने हत्तींनं वेढा दिला आहे. हत्तीनं या गावात धुडगूस घातला आहे. यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी हतबल झाले आहेत. घराशेजारी हत्तीचा वावर असल्याने फळबागांचे नुकसान तर होतच आहे. तर आता उन्हाळी शेती नंतर पावसाळी शेतीकडेही पाठ फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 2001-2 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावात पहिल्यांदा हत्तीचे आगमन झाले. कर्नाटक राज्यातून दोडामार्ग मध्ये दाखल झालेल्या हे हत्ती हळू संपूर्ण जिल्ह्यात फिरायला लागले.आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी बनले. या हत्तींना रोखण्यासाठी शासनाने अनेक शकलं लढवल्या. पण यात अपयश आलं. खंदर खोदली, मिर्चीपूड लावुन दोरखंड लावले, बनाना एअरगण, मधुमक्षिका पालन यात शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. आता हत्तीच दोडामार्ग तालुक्यातील केर गावात घरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील अतिशय डोंगराळ भागात असलेले केर हे एक गाव. गेले चार महिने या गावाला हत्तीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पाच हत्तीचा कळप यामध्ये एक तस्कर, एक मादी आणि तीन छोटे हत्ती आहेत. तर तीन चार महिन्याचे एक छोटे पिल्लू असून या पाच जणांच्या कळप गावात अक्षरशा धुडगूस घालतोय. या गावात मोठ्या प्रमाणात काजू, नारळ, सुपारीच्या बागा आहेत. पण हत्तीच्या भीतीने त्या गावातील लोक काजू पण काढायला गेले नाहीत. उन्हाळी शेतीकडे या लोकांनी पाठ फिरवली आहे. आता पावसाळी शेती करायची की नाही? या विवंचनेत येथील शेतकरी वर्ग आहे. रात्री-अपरात्री प्रवास करायला लोक घाबरत आहेत. कारण हत्तीचा कळप रस्त्यावरुन फिरत असतो. शेतकऱ्यांच्या केळी बागायती सह भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या भागातून हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील शेतकरी करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सेंद्रीय, विषमुक्त दुध निर्मिती टप्प्यातील प्रश्नाबाबत अभ्यास गटाची घोषणा, अहवाल दाखल करण्याची मंत्री सुनिल केदार यांची सूचना
- Mahadev Jankar : गायीच्या दुधाला लिटरला 50 रुपये दर द्यावा, महादेव जानकरांची सरकारकडे मागणी
- Farmers Agitation : शासकीय धान खरेदीची मर्यादा वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच आंदोलन