साडे 11 फुटांचा 'किंग कोब्रा' साप आढळला; भल्या मोठ्या 'नागराज'ला पाहून उंचावल्या भुवया
महाराष्ट्राचे अमेझॉन म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात साडे अकरा फुटांच्या 'किंग कोब्रा' साप आढळून आला होता
सिंधुदुर्ग - ग्रामीण भागात साप दिसणे किंवा परिसरातील सापाचा वावर ही सर्वसाधारण बाब मानली जाते. मात्र, विषारी जातीचा साप आढळून आल्यास दिवसभरत त्याचीच चर्चा असते. त्यातच, किंग क्रोब्रा किंवा धामण जातीचा भलामोठा साप दिसल्यास परिसरात भीतीचं वातावरण निर्माण होतं. अनेकदा वन विभागाकडून तत्परता न दाखवल्याने सर्प मित्रांना संपर्क साधून हे साप पकडण्यात येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असाच एक विषारी साप आढळून आला आहे. तब्बल ११ फूट लांबाच्या सापाला वन विभागाने पकडून दूर वनात सोडून दिले. त्यामुळे, ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.
महाराष्ट्राचे अमेझॉन म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात साडे अकरा फुटांच्या 'किंग कोब्रा' साप आढळून आला होता. झोळंबे गावात हा साप आढळला असून वन विभागाचे त्या सापाचा बचाव करत त्यास अज्ञातवासात सोडले. पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो. 'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' देखील म्हणतात. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग तालुका आहे. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत.
गावात कोंब्रा जातीचा साप आढळल्याने गावकऱ्यांनी साप पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी, नव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापाला पकडून वनात सोडून दिले. किंग कोब्रा ही सापाची सर्वात विषारी जात मानली जाते. या सापाचा दंश झाल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते. त्यामुळ, मानवी वस्ती किंवा लोकवस्तीच्या रहिवास परिसरात हा साप आढळल्यास वन विभागाकडूनही तत्काळ दखल घेत, सापाची आणि थोडक्यात माणसांचीही सुटका केली जाते.