(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chipi Airport : भाजप आमदार नितेश राणेंनी 'हवा' करूनही दुसरं विमान चिपी विमानतळावर पोहोचेना! चाकरमान्यांची गैरसोय सुरुच
Chipi Airport : कोकणातील चिपी विमातळावर मुंबई ते सिंधुदुर्ग विमान आज खराब वातावरणामुळे रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Chipi Airport : कोकणातील चिपी विमातळावर मुंबई ते सिंधुदुर्ग विमान आज खराब वातावरणामुळे रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे 18 ऑगस्टपासून चिपी विमातळावर दुसरं विमान चाकरमान्यांच्या सेवेत दाखल होणार असा मोठा गाजावाजा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता. मात्र, आज तिसऱ्या दिवशीही हे विमान आलेलं नाही. त्यामुळे चाकरमान्यांसाठी दुसरं विमान येणार की नाही याबाबत साशंकता आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर 18 ऑगस्टपासून दुसरे विमान पुरेसे प्रवासी नसल्याचे कारण विमान व्यवस्थापनने दिलं आहे. दुसऱ्या विमानाच्या सुटणाऱ्या पहिल्या फेरीला मुंबई विमानतळावर पुरेसे प्रवाशी उपलब्ध न झाल्याने ते विमान आज तिसऱ्या दिवशीही येऊ शकले नाही. परिणामी आता दुसऱ्या विमानाला पुरेसे प्रवासी कधी उपलब्ध होतात आणि ते विमान सिंधुदुर्ग विमानतळावर कधी लँडिंग होते? याकडे जिल्हावासियांचे लक्ष आहे.
नऊ महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर विमान प्रवासी वाहतूक सुरू झाली. तेव्हापासून सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणातील बदलामुळे विमान लॅन्डिंग करण्यासाठी पायलटला अडचणी येव लागल्या. आजही हे नियमित येणार विमान रद्द झालं आहे. खराब वातावरणामुळे याठिकाणीही अनेक वेळा विमान फेऱ्या रद्द झाल्या. याचा त्रास प्रवाशांना बसत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- राज्यभर सेलिब्रेटी झालेल्या शहाजीबापूंच्या सांगोला तालुक्यात सगळं नॉट ओके; विद्यार्थ्यांनी केला पंचनामा
- Sambhajiraje Chhatrapati : दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर चांगलेच, पण मराठा समाजातील गरीब मुलांनाही आरक्षण मिळायलं हवं : संभाजीराजे
- Sugarcan Workers : उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध