(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhajiraje Chhatrapati : दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर चांगलेच, पण मराठा समाजातील गरीब मुलांनाही आरक्षण मिळायलं हवं : संभाजीराजे
मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांसंबंधी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sambhajiraje Chhatrapati : मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सोमवारी (22 ऑगस्ट) मुंबईत (Mumbai) मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांसंबंधी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. स्वराज्य संघटना अशा सगळ्या घटकांच्या पाठीशी असल्याचे संभाजीराजे म्हणाले. मात्र, या मोर्चात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी असे आवाहन देखील यावेळी संभाजीराजे यांनी केलं आहे. दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच आहे. मात्र, गरीब मराठा समाजातील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे असेही संभाजीराजे म्हणाले.
दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर चांगलेच, मात्र मराठा समाजातील मुलांनाही आरक्षण मिळावं
मराठा समाजाच्या मागण्यांवरुन मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या संबंधीत मागण्यांसाठी सोमवारी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला स्वराज्य संघटनेचा पाठिंबा असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश होत असेल तर चांगली बाब असल्याचेही संभाजीराजे म्हणाले. दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच आहे. मात्र, गरीब मराठा समाजातील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे. ही बाब ध्यानात ठेवावी, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
मुंबई, पुणे, ठाणे या परिसरात दहीहंडी जास्त खेळला जातो. त्याला साहसी खेळाचा दर्जा देत असतील तर चांगलेच आहे, असे ते म्हणाले. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाशी संबंधित प्रश्नांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सोमवारी मुंबईत मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर ते म्हणाले, की तो त्यांचा अधिकार आहे. स्वराज्य संघटना अशा सगळ्या घटकांच्या पाठीशी आहे. मात्र या मोर्चात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाचे मुख्यमंत्री होते. आता ते सर्व समाजाचे उपमुख्यमंत्री आहेत. ते विशिष्ट समाजाचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही असेही संभाजीराजे म्हणाले. त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. तो त्यांचा अधिकार असल्याचेही यावेळी संभाजीराजे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: