Narayan Rane : दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरे थोड्याच दिवसात जेलमध्ये, संजय राऊतही सोबत असणार; नारायण राणेंचे भाकित
Narayan Rane On Aaditya Thackeray : खोक्यांबद्दल बोलणाऱ्या ठाकरेंना कोण खोकी पोहोचवायचे हे आम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे हे खोके पोहोचवणाऱ्यांपैकी होते असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. सुशांत सिंह आणि दिशा सालियन केसमध्ये (Disha Salian case) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) लवकरच जेलमध्ये जातील असा दावा नारायण राणेंनी केला आहे. तसेच त्यांच्यासोबत संजय राऊतही जेलमध्ये जातील असंही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, आता हे ठाकरे गट बैठक घेतात. थोड्या दिवसांनी आदित्य ठाकरे हे बैठकीलासुद्धा नसतील. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील. त्यांच्यासोबत संजय राऊत देखील असतील. यांच्याकडे असलेले 16 आमदारसुद्धा राहणार नाहीत.
एकनाथ शिंदे हे पोहोचवणाऱ्यांपैकी आहेत
मातोश्रीमध्ये बाळासाहेब राहयचे म्हणून ठाकरेंवर बोलायचं टाळतो असं म्हणत नारायण राणे म्हणाले की, ज्यांनी यांना खोकी पोहोचवली त्यांच्यावर यांनी बोलू नयेत. आम्हाला सगळं माहिती आहे, कुठून खोकी यायची, कितव्या माळ्यावर जायची. एकनाथ शिंदे हे खोके पोहोचवणाऱ्यांपैकी आहेत, घरी नेणाऱ्यांपैकी नाहीत.
राज्याच्या कारभारा संदर्भात उद्धव ठाकरे यांना शून्य माहिती आहे. विनायक राऊत आणि वैभव नाईक हे एकनाथ शिंदे केव्हा शिवसेनेत घेतायेत याची वाट पाहत आहेत असं नारायण राणे म्हणाले. पाहुणे म्हणून यायचं आणि कोंबडी वडे खाऊन जायचं असं म्हणत नारायण राणे म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गसाठी आतापर्यंत काय केलंय? कुणाला मदत तरी केलीय का?
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं असं मला वाटत नाही
शिंदे समिती रद्द करावी असं छगन भुजबळ यांना वाटतं, ते मंत्रिमंडळात आहेत असं नारायण राणे म्हणाले, ते म्हणाले की, कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना द्यावे असं मला वाटत नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाज कोणाला कधी घाबरला नाही. कोण धमकी देतो, आम्ही कुणाला घाबरत नाही. राज्य सरकारने योग्य तपासणी करून मराठा आरक्षण द्यावं.
नौदल दिनाच्या निमित्ताने मोदी सिंधुदुर्गात
पंतप्रधानांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर नेव्हीच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील पुतळ्याचे अनावरण होईल. यासाठी भाजप पक्ष म्हणून आम्ही कामाला लागलो आहे. नौसेना दिनी तारकर्ली आणि सिंधुदुर्ग किल्यावर मोदी जाणार आहेत. त्यावेळी नरेंद्र मोदी भाषण करतील. नौदल आणि राज्य सरकार या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.
ही बातमी वाचा: