एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंकडून भारतीय सैन्य दलाला मदतीचा हात; बदलत्या हवामानापासून संरक्षणासाठी दिले 50 कंटेनर

Shiv Sena Supports Indian Army Post Operation Sindoor: भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात. शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी दिले ५० कंटेनर. सैन्य दलाने व्यक्त केले आभार.

Shiv Sena Supports Indian Army: रायगड (उरण) :- राज्यात सगळीकडे 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेनं कर्तव्यभावनेचा विसर पडू दिलेला नाही. शिवसेनेनं भारतीय सैन्य दलाची मागणी पूर्ण केली आहे.  भारतीय सैन्य दलाला शिवसेनेच्यावतीने 50 कंटेनर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. यातील 46 कंटेनर यापूर्वीच सीमेवर रवाना करण्यात आले आहेत. तर, उर्वरित चार कंटेंनर आज उरणमधून सैन्याच्या हवाली करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. युवासनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हे कंटेनर भारतीय सैन्यदलातील अधिकारी सुभेदार सयाजी निगडे आणि नायक सुभेदार आनंद गायकवाड यांच्या हवाली करण्यात आले आहे.

शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्रा 10 ऑगस्ट 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये रवाना झाली होती. त्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील हजार पैलवानांनी शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलातील जवानांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजितकेले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्यावेळी महारक्तदान यात्रेत सहभाग घेतला होता. तसेच रक्तदान केले होते. त्यावेळी भारतीय सैन्य दलातील ब्रिगेडियर युद्धवीर सिंह सीखों यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी कंटेनर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी केली होती.

' ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील युद्ध तंत्रात बराच फरक पडला आहे. या युद्धादरम्यान आणि आणि नंतरही पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केले जातात. यावेळी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना सुरक्षितस्थळी लपायचे असल्यास भूमिगत बंकरमध्ये लपण्यावाचून दुसरा पर्याय नाही. मात्र प्रत्यक्ष सीमारेषेजवळ सिमेंट काँक्रीटचे कायमस्वरूपी बंकर बनवणे अशक्य असल्यानं कंटेंनरची मागणी सैन्यदलाकडून करण्यात आली होती. त्याचा वापर करून जलदगतीने बंकर उभारणे शक्य होते. तसेच सैनिक, शस्त्र आणि इतर वस्तू सुरक्षित ठेवता येत असल्याने कंटेनर उपलब्ध करून देण्याची मागणी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याकडे पत्र लिहून केली असल्याची माहिती आहे.

भारतीय सैन्यदलाकडून शिंदेंचे आभार

या विनंतीला मान देऊन शिवसेनेच्यावतीने 50 कंटेनर भारतीय सैन्याला देण्याचा निर्णय घेतला. यातील ४६ कंटेनर सीमेवर रवाना झाले  आहेत. तर, अखेरचे चार कंटेनर आज देशाच्या सीमावर्ती भागात रवाना करण्यात आले. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून हे कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भारतीय सैन्य दलाने हे कंटेनर स्वखर्चाने सीमावर्ती भागात घेऊन जाण्याची तयारी दर्शविल्याने उरण येथून हे उर्वरित चार कंटेनर सैन्यदलाच्या हवाली करण्यात आले आहेत. दरम्यान, केलेल्या विनंतीला मान देत तत्काळ ही मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय सैन्यदलाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आभार मानले आहेत. लवकरच सैन्याचे अधिकारी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचे पत्र शिंदे यांना सुपूर्द करणार असल्याचे बाजीराव चव्हाण यांनी सांगितले आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

CJP vs Assam Police : अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांना अल्टिमेटम; आशुतोष रांकांला सोडा, नाहीतर...
अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांना अल्टिमेटम; आशुतोष रांकांला सोडा, नाहीतर...
SA vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेंबा बावुमा गरजला! ठोकले वादळी शतक अन् थेट MS धोनीची बरोबरी, विराट कोहलीचा विक्रम धोक्यात
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेंबा बावुमा गरजला! ठोकले वादळी शतक अन् थेट MS धोनीची बरोबरी, विराट कोहलीचा विक्रम धोक्यात
Seva Sankalp Yatra : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
बंगालमध्ये टिळा, शेंडी आणि धोती सरकार, साधुसंतांचा अपमान कराल तर तुरुंगात जाल, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा इशारा
बंगालमध्ये टिळा, शेंडी आणि धोती सरकार, साधुसंतांचा अपमान कराल तर तुरुंगात जाल, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा इशारा

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Embed widget