एक्स्प्लोर
मुंबईत उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह चार मुलींची सुटका
मागील 10 तारखेला देखील मुंबई पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. गोरेगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकून दोन मुलींची सुटका केली होती. विशेष म्हणजे रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या दोन तरुणी मॉडेल आणि अभिनेत्री होत्या.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने काल रात्री कांदिवली येथील स्टारबक्स कॅफेमध्ये बॉलिवूड आणि सिरीयलशी संबंधित अभिनेत्रीसह चार मुलींची सुटका करण्यात आली. तर एका पुरुषासह दोन महिलांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी संध्याकाळी मुंबईच्या एसएस शाखेला कांदिवली पश्चिमेच्या महावीरनगर भागात स्थित स्टारबक्स कॅफेमध्ये सेक्स रॅकेट संबंधित व्यवहार होत असल्याची बातमी मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून आदित्य, प्रियांका आणि प्रमिला या आरोपींना अटक केली. सध्या या प्रकरणी कांदिवली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणात अधिक तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांनी उच्चभ्रू सेक्स रॅकेट उघड केले आहेत. या सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूडशी संबंधित असलेल्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला आहे. मग ते कास्टिंग डायरेक्टरची प्रोडक्शन टीम असो किंवा चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये काम करणारे कलाकार असो. या प्रकरणी आदित्य, प्रियांका आणि प्रमिला यांना अटक केली असून प्रियांका ही प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते तर प्रमिला ही सेक्स रॅकेटसाठी मुली सप्लाय करण्याचं. ज्या चार अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे, त्यापैकी एकीने सिनेमात काम केले असून दोघीजणी कलर्स वाहिनी कार्यक्रमात अभिनेत्री आहेत तर एक मुलगी अल्पवयीन आहे. मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेल आणि अभिनेत्रींना अटक या सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूडशी संबंधित लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचा समोर आला आहे. 23 तारखेला रात्री सुद्धा मुंबई पोलिसांनी असेच अजून एक सेक्स रॅकेट उघड केलं. कांदिवली येथील स्टारबक्स कॅफेमध्ये सेक्स रॅकेटसंदर्भात व्यहार सुरू होता. याची खबर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली समाजसेवा शाखेने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ स्टारबक्स कॅफेकडे धाव घेतली. स्टार बॉक्स कॅफेमध्ये या सेक्स रॅकेटचा व्यवहार करणार्या तिघांना समाजसेवा शाखेने अटक केली तर चार बॉलीवूडच्या आणि कार्यक्रमांच्या अभिनेत्रींची या सेक्स रॅकेटमधून सुटका करण्यात आली. मुंबईच्या कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून कांदिवली पोलिस या प्रकरणांमध्ये अधिक तपास करीत आहेत. याआधी जेवढी बॉलिवूड संबंधित सेक्स रॅकेट उघड झाली त्यांचं आणि यांचं काही आपसात संबंध तर नाही ना या अनुषंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत. संबंधित बातम्या : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्री अटकेत मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड हायप्रोफाईल सेक्स रॅकेटप्रकरणी बॉलिवूड आणि बंगाली अभिनेत्री अटकेत बॉयफ्रेण्ड राहुलने प्रत्युषाला सेक्स रॅकेटमध्ये ढकललं होतं?
आणखी वाचा























