एक्स्प्लोर

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्री अटकेत

मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून दोन टीव्ही अभिनेत्री, एक मॉडेल आणि दोन दलालांना अटक करण्यात आली. यामध्ये 'सावधान इंडिया' या शोमधील एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.   ज्या ठिकाणी हा छापा टाकण्यात आला, तो परिसर फिल्मसिटीपासून अतिशय जवळ आहे. शिवाय इथे दररोज अनेक टीव्ही कलाकारांची ये-जा सुरु असते.   'दलाल बनून सापळा रचला'   मॉडेल, अभिनेत्री आणि दलालांना एका मॉलच्या बाहेर अटक करण्यात आली, अशी माहिती या रॅकेटचा खुलासा करणारे अमित जलाल यांनी दिली.   अमित जलाल यांच्या माहितीनुसार, या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यानंतर आम्ही दलाल बनून सापळा रचला. याद्वारे आम्ही खरे दलाल सायरा आणि अशरफ उर्फ अमनपर्यंत पोहोचलो.   अमन तिथे पोहोचताच आम्ही त्याला अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एक 'सावधान इंडिया'मध्ये काम करणारी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि रॅम्प मॉडेल आहे. या सगळ्यांविरोधात दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.   मुख्य आरोपी कोण?   पोलिसांच्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमागे कबीर नावाचा व्यक्ती आहे. कबीर हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नव्या तरुण-तरुणींना पैशांचं आमिष दाखवून या धंद्यात आणत असेल. कबीरच्या इशाऱ्यावरच अशरफ काम करतो. अशरफ हा कॉलेज विद्यार्थी असून तो शेवटच्या वर्षात शिकत आहे. दलाल सोशल वेबसाईट्सच्या माध्यामातून त्यांचे फोटो पाठवत, असं अमित जलाल यांनी सांगितलं.   मुलींना कुठे पाठवत? सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री 50 हजारांपासून 1 लाख रुपये घेत असत. दलाल त्यांना बरेचदा हायप्रोफाईल बिजनेसमन आणि कॉर्पोरेट क्लायंटकडे पाठवत असत.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार

मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी

Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश

Embed widget