एक्स्प्लोर

Share Market News :घसरणीनंतर शेअर बाजार वधारत बंद, 'या' स्टॉक्सने बाजार सावरला; तरीही गुंतवणूकदारांना फटका

Share Market News : दिवसभरातील अस्थिरतेनंतर आज भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारत स्थिरावले. आयटी सेक्टरमध्ये चांगली तेजी दिसून आली.

Share Market News : आज आठवड्यातील पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Share Market News) चढ-उतार दिसून आला. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजारात खरेदीचा जोर वाढला. त्यामुळे बाजार नीचांकी पातळीपासून वधारत बंद झाला. आज दिवसभरातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 169 अंकांच्या तेजीसह 59,500.41 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 44.60 अंकांनी वधारत 17,648.95 अंकांवर बंद झाला. आज बाजारात आयटी सेक्टरमध्ये (IT Sector) चांगलीच तेजी दिसून आल्याने बाजार सावरण्यास मदत झाली. 

आज दिवसभरातील ट्रेडिंग सत्रात आयटी (IT Sector) आणि बँकिंग सेक्टरमधील (Banking Stocks) कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर दरात नफावसुली दिसून आल्याने घसरण झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, निफ्टीमधील 50 पैकी 29 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी आणि 21 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

गुंतवणूकदारांना फटका 

शेअर बाजारातील व्यवहार आज तेजीसह बंद झाले असले तरी गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 268.60 लाख कोटी इतके झाले. मागील ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 269.65 लाख कोटी इतके होते. जवळपास 1.05 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील तीन दिवसात गुंतवणूकदारांचे एकूण 11.78 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. 

इंडेक्‍स  किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल?
BSE Sensex 59,574.40 59,644.24 58,699.20 0.00
BSE SmallCap 27,597.06 27,927.56 27,433.54 -0.10%
India VIX 17.71 19.39 17.29 2.25%
NIFTY Midcap 100 30,185.85 30,494.35 29,960.80 -0.19%
NIFTY Smallcap 100 9,233.00 9,351.40 9,185.95 -0.10%
NIfty smallcap 50 4,181.00 4,235.05 4,155.45 -0.12%
Nifty 100 17,571.85 17,676.60 17,331.90 -0.13%
Nifty 200 9,189.65 9,248.65 9,071.55 -0.14%
Nifty 50 17,648.95 17,709.15 17,405.55 0.25%

या शेअर्समध्ये तेजी

आजच्या दिवसभरातील व्यवहारात शेअर बाजारात  BAJFINANCE, BAJAJFINSV, HCLTECH, INFY, NTPC, WIPRO, RIL, MARUTI आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.  

या शेअर्समध्ये घसरण 

LT, INDUSINDBK, TATASTEEL, HUL, Airtel, Tata Motors, ITC, SBI या कंपन्यांच्या मोठी घसरण दिसून आली. 

बाजाराची सुरुवात कशी होती? 

आज बाजाराच्या सुरुवातीला बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 229.21 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरून 59,101.69 वर उघडला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 62.40 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी घसरून 17,541.95 वर उघडला. बाजार उघडल्यानंतर काहीसा घसरलेला सेन्सेक्स नंतर सावरल्याचं दिसून आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
ZP Election : झेडपी निवडणुकांचा मुहूर्त पुन्हा चुकणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचे सहकार्य मिळत नसल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
Embed widget