Satara Rain : सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; रब्बी पिकांना जीवदान, फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता
Satara : हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शनिवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर चांगलेच झोडपून काढले.
सातारा : मोसमात पाऊस पडला नाही असा धुवाँधार अवकाळी पाऊस सातारा जिल्ह्यात (Satara Rain) झाला. सलग दोन कोसळलेल्या पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नाल्यांसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती सुद्धा कोसळल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे सातारा शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यानेही अडचणीत भर पडली. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शनिवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर चांगलेच झोडपून काढले.
रब्बीला फायदा, पण फळबागा कोलमडल्या
सातारा जिल्ह्यात (Satara Rain) यंदा हुकमाचा मोसमी पाऊस पुरेसा झालेला नाही. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोयना धरणातही 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही. अनेक तलावही पूर्ण क्षमतेनं भरलेली नाहीत. त्यामुळे खरीप हंगाम कोरडा गेला आहे. अशा स्थितीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना जीवदान मिळालं असलं, तरी हातातोंडाला आलेल्या फळबागा मात्र कोलमडून पडल्या आहेत. अवकाळीमुळे फळबागांवर विपरित परिणाम झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील काही भागात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकाला होईल अनेक भागात द्राक्ष, डाळिंब फळबागा तोंडाला आल्या आहेत.
संरक्षक भिंती कोसळल्या
दरम्यान, सातारा शहरात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी नाल्याच्या संरक्षक भिंती कोसळण्याच्या सुद्धा घटना घडल्या.
'या' भागात पडणार वादळी पाऊस
दुसरीकडे, हवामान विभागानं (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
30 नोव्हेंबरपर्यंत 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान असू शकते. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या