एक्स्प्लोर

Ramdas Athawale: मोठी बातमी: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या गाडीचा साताऱ्यात अपघात, कार कंटेनरला जोरात धडकली

Ramdas Athawale Accident: रामदास आठवले यांच्या कारचा अपघात झाला आहे. त्यांची कार कंटेनरला जोरात धडकली. मात्र, या अपघातामध्ये आठवलेंना कोणतीही दुखापत झाली नाही.

सातारा: केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले (Ramdas Athawale) हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी वाई परिसरात त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेत कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. परंतु,सुदैवाने या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

अपघातानंतर रामदास आठवलेंची 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया

या अपघातानंतर रामदास आठवले यांनी फोनवरुन 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी काल महाडला होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनासाठी मी महाडमध्ये होतो. रात्री ९ वाजेपर्यंत मी महाडमध्ये होतो.त्यानंतर मी महाबळेश्वरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेलो. त्याठिकाणी माझा मुक्काम होता. त्यानंतर मी वाईमध्ये आलो. वाईमधून मुंबईला निघालो तेव्हा सव्वा सहा वाजता खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत होते, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले. तेव्हा आमची पोलिसांची गाडी कंटेनरला ठोकली. आमच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला पण आमची गाडी ठोकली. यामध्ये आमच्या गाडीच्या इंजिनाचे नुकसान झाले. माझ्याबरोबर माझी पत्नी सीमा आणि तिची आई होती. मात्र, आम्ही सगळे सुखरुप आहोत, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

आणखी वाचा

माझी राज्यसभेची दोन वर्षे शिल्लक, शिंदेंच्या खासदाराला तिकडे पाठवा; मला शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी द्या: रामदास आठवले

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget